भारताचा दारुण पराभव; गौतम गंभीरवर टीकेची झोड, राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाला गंभीर?

गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर आणि विशेषत: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली आहे. गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत भारताला तब्बल ४०८ धावांनी हार पत्करावी लागली. गुवाहाटीत ५४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ १४० धावांत गारद झाला आणि हा भारताचा घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने झालेल्या पराभवांपैकी सर्वात मोठा पराभव ठरला. या दारुण कामगिरीनंतर सोशल मीडियाद्वारे गंभीरवर तीव्र टीका सुरू झाली असून त्याने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही ठिकाणी तर गंभीर लवकरच पद सोडणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत आहेत.


सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीरने पराभवाची जबाबदारी स्वीकारली. “दोष सर्वांचा आहे, पण सुरुवात माझ्यापासून करा,” असे तो म्हणाला. तसेच आपल्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल, असं सांगत गंभीरने इंग्लंड दौर्‍यातील चांगल्या कामगिरीची आणि आपल्या मार्गदर्शनाखाली जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया कपची आठवणही करून दिली. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाला अनेक अनपेक्षित धक्के बसले. ३६ वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून कसोटी पराभव, १९ वर्षांनी बंगलुरूच्या चिन्नास्वामीवर हार, पहिल्यांदाच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली, १२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव, वानखेडेवरील पराभव, तसेच पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ३-० ने क्लीन स्वीप, अशा अनेक निराशाजनक निकालांची नोंद गंभीरच्या कार्यकाळात झाली. याशिवाय, टीम इंडिया पहिल्यांदाच WTC फायनलसाठी पात्र ठरू शकली नाही, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही २५ वर्षांनी घरच्या मैदानावर मालिका गमवावी लागली.


या सलग पराभवांमुळे आणि संघाच्या सतत ढासळलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. गौतम गंभीरचे प्रशिक्षकपदही आता संकटात आल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआय लवकरच या प्रकरणी निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. चाहत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी, संघाची घसरलेली कामगिरी आणि गंभीरवर वाढत चाललेला दबाव पाहता आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या