Tata Sierra Launch: १९९१ नंतर भारतात टाटा सिएराचे जोरदार 'पुनरागमन' 'ही' असेल किंमत, नव्या अंदाजात मिड प्रिमियम एसयुव्ही सेगमेंटमध्ये लाँच

मोहित सोमण: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (TMPV) कंपनीने आपले मिड लक्झरी एसयुव्ही सेगमेंगमध्ये जोरदार पुनरागमन करत कंपनीने नवा बेंचमार्क प्रस्थापित करण्यासाठी आज नव्या टाटा सिएराची घोषणा कंपनीने केली. घोषणा यापूर्वीच केली असली तरी कंपनीने आज नव्या चारचाकीची किंमतही स्पष्ट केली आहे. ११.४९ लाखांपासून कारची किंमत सुरु होणार असून होणार असल्याचेही कंपनीने आज स्पष्ट केले. कंपनीने ही नव्या युगाची सुरुवात एसयुव्ही सेगमेंगमध्ये होत असल्याचेही आज पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. १९९१ साली या कारचे लाँचिग झाले होते पुन्हा नव्याने टाटा मोटर्सने आधुनिक फिचर्ससह नव्या आवृत्तीचे अनावरण केले आहे. थ्री डोअर लेआऊटसाठी प्रसिद्ध असलेल्या या गाडीत यंदा पाच डोअर लेआऊट असणार आहे. १५२५× ९२५ मिलीमीटर पॅनोरामिक सनरूफसह, ६२२ मिलीमीटर बूट स्पेस (VDA), ट्रिपल स्क्रीन डिस्प्ले, सोनिक शाफ्ट साऊंडबार, ५ जी कनेक्टिव्हिटी, IP बेस टेलिमॅटिक्स कमांडस, जेबीएलसह डॉल्बी ॲटमॉस, अलेक्सा, मॅप माय इंडिया, ओटीए इनाबल क्लाऊड, क्लाऊड बेस अँप्स, सेफ्टी व सिक्युरिटीज फिचर्ससह १.५ TGDI तंत्रज्ञान, ६ एअरबॅग अशा अनेक फिचर्ससह कार बाजारात पदार्पण करत आहे.


सेफ्टी फिचर्स पाहिल्यास, ADAS Level 2 (22 Features), Thinnest Headlamps, रिअर सनशेड व रिअर एसी वेंटस, थ्री रिलॅक्सेशन, ३ टचस्क्रीन डिस्प्ले, Colled Glovebox, ड्रायव्हर मेमरी सीट, स्वतंत्र पॅसेंजर स्क्रीन असे विविध फिचर्स देण्यात आल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे.


कंपनीच्या मते अनेक खरेदीदारांसाठी, सिएरा नावाचे जुने 'मूल्य' आहे. पहिल्या पिढीतील मॉडेल हे भारतातील लाइफस्टाइल एसयूव्हीच्या सुरुवातीच्या प्रयत्नांपैकी एक होते आणि त्याच्या परतफेडीमुळे जुन्या चाहत्यांकडून आणि नवीन ग्राहकांकडून गाडीबाबत आणखी रस निर्माण होण्याची शक्यता आहे असे म्हटले. उद्योगामध्‍ये नवीन प्रीमियम मिड एसयूव्‍ही क्षेत्राची निर्मिती केली असल्याचे कंपनीकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.


नवीन लुकमधील टाटा सिएरा लाँच करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लिमिटेडचे एमडी व सीईओ शैलेश चंद्रा म्‍हणाले आहेत की,'नवीन सिएरासह आम्‍ही भारतीयांच्‍या गतीशीलतेचा अनुभव घेण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करत आहोत. टाटा सिएरामधून आमचा विश्वास दिसून येतो की, ग्राहक साधारणपेक्षा अधिक प्रेरित करणारी नाविन्‍यता, भावनिकतेशी जुळणारी डिझाइन आणि प्रत्‍येक प्रवासाला उत्‍साहित करणारा प्रीमियम अनुभव मिळण्‍यास पात्र आहेत. या प्रतिष्ठित कारने अभिमान जागृत करण्‍यासाठी, व्‍यक्तिमत्त्व व्‍यक्‍त करण्‍यासाठी आणि प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यासाठी पुनरागमन केले आहे. ही कार उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा, तंत्रज्ञान व सुरक्षितता देते. सिएरा नेतृत्‍व करण्‍याप्रती भारतीयांना उद्देश व विशिष्‍टतेसह पुढे जाण्‍यास प्रेरित करणारी आयकॉन वितरित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता आहे.'


कारचे नवे स्वरूप व वारसा:


सिएराने १९९१ मध्‍ये पदार्पण केले तेव्‍हा भारतातील व्‍यक्‍तींनी आकर्षक सिल्‍हूट, प्रगतीशील डिझाइन व अग्रणी वैशिष्‍ट्ये कधीच पाहिलेली आपण पाहिलेली नव्‍हती मात्र यावेळी कार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.


नवीन श्रेणीची निर्मिती: प्रीमियम मिड-एसयूव्‍ही


सिएरा श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. ग्राहकांच्‍या गरजा व त्‍यांच्‍या विकसित होत असलेल्‍या महत्त्वाकांक्षा जाणून घेत डिझाइन करण्‍यात आलेली सिएरा मध्‍यम आकाराच्‍या एसयूव्‍हीला अधिक लक्षवेधक करते. या कारमधील एैसपैस जागा, आरामदायीपणा, आलिशान सुविधा, सुरक्षितता व दैनंदिन उपयुक्‍ता या प्रत्‍येक वैशिष्‍ट्याला अधिक दृढ करत प्रीमियम स्‍तराची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यासह संपूर्ण श्रेणीला उच्‍च स्‍तरावर नेण्‍यात आले आहे. सिएरा फक्‍त एसयूव्‍ही नाही तर प्रगतीच्‍या दिशेने घेऊन जाणारी वेईकल आहे, जी उत्‍साहवर्धक व उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते, ज्‍यामधून व्‍यक्तिमत्त्व व महत्त्वाकांक्षा दिसून येते असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


प्रत्‍येक पिढीचे लक्ष वेधून घेणारी एसयूव्‍ही-


भारतातील व्‍यक्‍ती विकसित होत आहेत, तसेच त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षा देखील बदलत आहेत. नवीन सिएरा प्रत्‍येक पिढीसोबत भावनिक नाते निर्माण करते. मासिकांमध्‍ये या कारला पाहिलेल्‍या व्‍यक्‍तींची आता कार खरेदी करण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. रस्‍त्‍यावर या कारच्‍या ड्रायव्हिंगचा आनंद घेतलेल्‍या व्‍यक्‍तींची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली आहे. आणि आता ही कार तरूण ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी या कारच्‍या प्रतिष्ठित रेड डॉट डिझाइन अवॉर्डसह सन्‍मानित करण्‍यात आले होते.


या एसयूव्हीमध्ये तीन इंजिन पर्याय असतील -


१.५-लिटर पेट्रोल
१.५-लिटर डिझेल
१.५-लिटर हायब्रिड


हे मॉडेल सात प्रकारांमध्ये आणि सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे खरेदीदारांना निवडण्यासाठी विस्तृत श्रेणी मिळेल असे कंपनीने म्हटले आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टाटा सिएराची संपूर्ण ऑन-रोड किंमत राज्यांनुसार वेगवेगळी असेल. मात्र फिचर व नवी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला पाहत कंपनीने आक्रमक किंमतीसह कार बाजारात लाँच केली होती.

Comments
Add Comment

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर दिल्ली उच्च

कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेचा १८ जानेवारीपर्यंत ब्लॉक

मोठ्या प्रमाणावर लोकल रद्द होणार बेस्टला ज्यादा बस सोडण्याची रेल्वेची विनंती मुंबई : सहाव्या मार्गिकेचे काम

भारत आणि न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

२० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह रोजगाराच्या संधींचे दालन खुले नवी दिल्ली : भारताने जागतिक व्यापाराच्या आघाडीवर

भारतीय संघ कसोटीत अपयशी; टी - २० त ‘ब्लॉकबस्टर’!

मुंबई  : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र यश देणारे ठरले. या वर्षात भारताने १० कसोटी, १४ वनडे आणि २२

पाकिस्तानच्या नक्वीचा भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंनी केला अपमान

मुंबई  : जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ३४७