मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण मुंबईला थेट वाढवण बंदराशी जोडण्यासाठी ३०० मीटर लांबीचा उन्नत पूल उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा पूल तयार झाल्यानंतर एमएमआरडीएच्या उत्तन–विरार सागरी सेतूला वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट लिंक मिळेल आणि त्यामुळे मुंबईहून वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.


जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) देशातील सर्वात मोठ्या क्षमतेचे वाढवण बंदर उभारत आहे. या बंदराकडे सरळ प्रवेश देता यावा म्हणून NHAI वरोर–तवा जंक्शनदरम्यान विशेष महामार्गाचे बांधकाम करणार आहे. हा महामार्ग थेट वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएच्या मते, हाच द्रुतगती मार्ग उत्तन–विरार सागरी सेतूसोबत जोडल्यास संपूर्ण सागरी कॉरिडॉरमध्ये अत्यंत महत्त्वाचे कनेक्शन तयार होईल.


कसा असेल ३०० मीटर उंचीचा उन्नत पूल ?


उत्तन–विरार सागरी सेतूचा शेवट विरारमधील चिखल डोंगरी भागात आहे.


या ठिकाणापासून काही अंतरावरच वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्ग (VME) जातो.


दोन्ही मार्ग एकमेकांशी प्रत्यक्ष जोडण्यासाठी ३०० मीटर उन्नत पुलाचे बांधकाम केले जाईल.


हा फ्लायओव्हर NHAI उभारणार असून राज्य आणि केंद्र शासनातील अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.


एमएमआरडीएच्या अंदाजानुसार, सागरी किनारा मार्ग, विविध सागरी सेतू, जोड रस्ते, द्रुतगती मार्ग आणि विशेष महामार्ग अशा एकूण सुमारे १२० किमी लांबीचा अखंड, सरळ आणि उच्च-गतीचा मार्ग तयार होणार आहे.
या मार्गामुळे :


दक्षिण मुंबई ते वाढवण बंदर फक्त एका तासात पोहोचता येईल


विरार–वाढवणदरम्यान स्वतंत्र सागरी मार्ग बांधण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च वाचेल


बंदर वाहतूक, औद्योगिक प्रवास, लॉजिस्टिक नेटवर्क आणि मालवाहतुकीला मोठा लाभ मिळेल

Comments
Add Comment

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी

दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

मुंबई (सचिन धानजी): दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच