अयोध्या: अनेक वर्षांचे हिंदूंचे स्वप्न आज साकार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. भगवान राम आणि माता सीतेच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्तावर हा ध्वज फडकवला जाणार आहे. या ध्वजारोहणासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल झाले असून समारंभापूर्वी मोदींचा रोड शो सुरू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'रोड शो'ला साकेत कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरुवात झाली. त्यांच्या स्वागतासाठी रामपथाच्या दोन्ही बाजूंना रांगेत उभ्या असणाऱ्या हजारो रामभक्तांनी मोदींवर पुष्पवृष्टी केली. हिंदूच्या धार्मिक भावनांना सन्मान देण्याचे महत्त्वाचे काम मोदींने केल्यामुळे अयोध्येत पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
अयोध्या : हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२:१० ते १२:३० या शुभ ...
पंतप्रधान मोदी रोड शोद्वारे व्हीआयपी गेट क्रमांक ११ मधून राम मंदिरात पोहोचले असून मंदिर परिसरातील सप्तऋषी मंदिर, शेषावतार मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिरात त्यांनी सर्वप्रथम दर्शन घेतले आहे. त्यानंतर ते राम लल्लाला नमस्कार करणार आहेत. मंदिरातील सर्व विधींनंतर मोदींच्या हस्ते दुपारी १२:१० ते १२:३० पर्यंतच्या शुभ मुहूर्तावर मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.