कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा स्व. आनंद दिघे उड्डाणपूल बंद

कडोंमपाकडून पुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामास सुरुवात


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या स्व. आनंद दिघे उड्डाणपुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, या काळात उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही वाहतूक मर्यादा लागू राहील. या कालावधीत पुलावरील जुना डांबर थर काढून नव्या डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. कामाच्या दरम्यान परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.


कल्याण पूर्वेतून स्व.आनंद दिघे पुलावरून कल्याण पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ही वाहने चक्कीनाका व श्रीराम चौक मार्गे वळवली जातील. कल्याण पश्चिमेतून स्व. आनंद दिघे पुलावर येणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील. ही वाहने सम्राट चौक येथून सरळ पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार–शांतीनगर–श्रीराम चौक मार्गे कल्याण पूर्वेकडे वळतील. उल्हासनगर व कल्याण पश्चिमहून कल्याण पूर्वेकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौक येथे प्रवेशबंदी राहील. वाहतूक विभाग पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली असून २५ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर व ऑक्सिजन गॅस वाहने यांना बंदीमधून सूट देण्यात आली आहे. महापालिका आणि वाहतूक विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

मतदारांसाठी डिजिटल माध्यमातून मतदार पोर्टल सुविधा

उल्हासनगर महापालिकेचा राज्यात पहिला उपक्रम उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकाने मतदार सुविधा डिजिटल माध्यमातून

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांऐवजी पक्षाच्या शाखांना भेटी

ठाण्यात ११४ उमेदवार अब्जाधीश !

ठाणे : येत्या १५ जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी तब्बल ६४९

उल्हासनगरात शिवसेना-भाजप आमने-सामने

उल्हासनगर : निवडणूकपूर्व युतीचा गाजावाजा, मंचावर दोस्तीचे फोटो आणि भाषणांत एकजुटीचे आश्वासन; मात्र प्रत्यक्ष

ठाण्यात नातेवाइकांमध्येच लढत

ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत मागील काही निवडणुकांप्रमाणे यंदाही काही कुटुंबे निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत

अंबरनाथमध्ये काँग्रेसला खिंडार

काँग्रेसचे १२ नगरसेवक निलंबित अंबरनाथ : अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची चिन्ह आहेत. भाजपला साथ