इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग अणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. ज्यात मुंबई ते पुण्यादरम्यान चालणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच लोकलचे वेळापत्रकसुद्धा बिघडणार असल्याने दररोज मुंबई ते पुणे ये-जा करणाऱ्यांना प्रवासामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.



२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान वेळापत्रकातील मुख्य बदल


- पुणे-मुंबई इंटरसिटी आणि पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्यांना २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचण्यास १० ते १५ मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे.


-२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत धावणाऱ्या पुणे-लोणावळा लोकल गाड्या लोणावळ्यापर्यंत न जाता तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.


- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पुणे मार्गे चेन्नई आणि हैदराबादला जाण्याऱ्या एक्स्प्रेसला लोणावळ्यापर्यंत पोहोचण्यास १० ते १५ मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे.


- २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी अप (मुंबईकडे जाणारा) आणि डाउन (पुण्याकडे येणारा) या दोन्ही मार्गांवर सकाळी ११.२५ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असणार आहे.



एक्स्प्रेस गाड्यांना उशीर!


पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस: १ तास १५ मिनिटं उशीराने


कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस: ४० मिनिटं उशीराने


बंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्स्प्रेस: ३० मिनिटं उशीराने


दौंड-इंदूर एक्स्प्रेस: १ तास उशीराने


दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी या ११ दिवसांच्या कालावधीत रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीच्या वेळापत्रकाची सद्यस्थिती तपासून घ्यावी.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका