पाकिस्तानच्या शेजाऱ्याने दिली गोल्डन ऑफर

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना भारताला गुंतवणुकीसाठी आकर्षक ऑफर दिली. अफगाणिस्तान सरकार सोन्याच्या खाणीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना पुढील पाच वर्षे कर सवलत देणार असल्याचे ते म्हणाले. असोचेमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी यंत्रसामग्री आयात केल्यास त्यांना केवळ एक टक्के शुल्क भरावे लागेल, असे ते म्हणाले.

अफगाणिस्तानमध्ये प्रचंड क्षमता आहे. तुम्हाला तिथे फारसे स्पर्धकही मिळणार नाहीत.गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना करासंबंधी फायदा दिला जाईल आणि जमीनही उपलब्ध करून दिली जाईल; असे अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी म्हणाले. नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना पाच वर्षांसाठी कर सवलत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

सोने उत्खननासाठी तांत्रिक आणि व्यावसायिक टीम किंवा व्यावसायिक कंपन्यांची आवश्यकता असेल. पण शक्य त्या क्षेत्रांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती अफगाणिस्तानमधूनच व्हावी एवढीच अट असल्याचे ते म्हणाले.

आम्ही भारत आणि अफगाणिस्तान मधील संबंध सुधारू इच्छितो. व्हिसा, एअर कॉरिडोर आणि बँकिंग व्यवहार यांसारख्या काही लहान अडचणी आहेत ज्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सुधारण्यासाठी आवश्यक आहेत; असेही अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी म्हणाले.
Comments
Add Comment

आम्ही लाखो मशिदी उभारू, MIM चे असदुद्दीन ओवैसी फुत्कारले

नवी दिल्ली : जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी

अयोध्येतील राम मंदिरावर उद्या ध्वजारोहण

ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी

‘आयएनएस माहे’ आज भारतीय नौदलात

मुंबई : भारतीय नौदलाची सामरिक ताकद अधिक भक्कम करणारा सोहळा सोमवारी पाहायला मिळणार आहे. माहे-क्लास अँटी सबमरीन

मेट्रो शहरांमधील विषारी हवेने मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात!

नवी दिल्ली : वायू प्रदूषण आता केवळ श्वसनाचा धोका राहिलेला नाही, तर लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत

'आयुष्मान भारत'अंतर्गत सत्तरीनंतर १० लाखांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली : भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील

‘सिंध पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूतोवाच नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानात असलेला ‘सिंध प्राप्त पुन्हा भारताचा