'आयुष्मान भारत'अंतर्गत सत्तरीनंतर १० लाखांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली : भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र,आता १० लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे. आता ७० वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना फायदा होणार आहे.


आयुष्मान भारत ही मोदी सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेद्वारे देशातील गरीब जनतेला आरोपग्यविमा दिला जातो. यामुळे गंभीर आजारावरील उपचार मोफत किंवा कमी पैशांमध्ये केले जातात. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाखांचे कॅशलेस कव्हर मिळते. देशातील हजारो रुग्णालयांमध्ये याच्या माध्यमातून उपचार घेता येतात. या योजनेत सर्व गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होत आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबातील पती-पत्नी, मुले (नवजात बालके), पालक, आजी-आजोबा, भावंडे, सासू-सासरे आणि कुटुंबासोबत राहणाऱ्या इतर सदस्यांच्या उपचारासाठी ५ लाखांचे कव्हर मिळते.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे