भाजपचा मोठा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तरुणांना प्राधान्य

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला गती दिली आहे. आता भाजपने देखील एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून, निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे यामुळे दिसू लागली आहेत.


मुंबईतील एका कार्यक्रमात तरुणांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप ३५ वर्षांखालील तरुणांना कमीत कमी ४० टक्के तिकिटे देणार आहे.” युवाशक्तीवरचा विश्वास आणि पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या दिशेने हा मोठा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


भाजपच्या या भूमिकेमुळे सध्याच्या अनेक पदाधिकाऱ्यांची तिकीट कापले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद ते पंचायत समिती या सर्व पातळ्यांवरील निवडणुकांमध्ये हा नियम लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला भाजपचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार असून, युवा नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक


महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक कधी होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.


नगरपालिका : २४६


नगरपंचायती : ४२


एकूण जागा : ६,८५९


अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबर


अर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंत


मतदान : २ डिसेंबर


मतमोजणी : ३ डिसेंबर



विभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायती


कोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती : ४५, नागपूर : ५५

Comments
Add Comment

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Beed News: दोन बहिणींनी अपहरणाचा कट लावला उधळून

बीड: महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :