‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे देशभरात ओळख मिळवलेल्या अदाच्या अत्यंत लाडक्या आजीचे निधन झाले आहे. आदा त्यांना प्रेमाने ‘पाती’ असे संबोधत असे आणि त्यांचे नाते अतिशय घट्ट होते. आज (२३ नोव्हेंबर) सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.


अदा शर्माच्या आजींना अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि डायव्हर्टिक्युलायटिस या गंभीर आजारांनी ग्रासले होते. गेल्या जवळपास महिनाभर त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. अदा सोशल मीडियावर आजीसोबतचे क्षण वारंवार शेअर करायची. तिचे ‘पार्टी विथ पाती’ हे व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते.


सूत्रांनुसार, अदा आजीच्या सर्वात जवळची होती आणि बऱ्याच काळापासून ती त्यांच्या सोबतच राहत होती. मात्र अदाने अजून या दुःखद प्रसंगाबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.


अदा आणि तिच्या आजीचे नाते किती जिव्हाळ्याचे होते याचे अनेक किस्से आहेत. २०२१ मधील एका मुलाखतीत अदाने सांगितले होते की तिची आजी सोशल मीडियावर तिच्या पोस्टवरील कमेंट्स काळजीपूर्वक वाचायची.


ट्रोलिंग दिसल्यास त्या स्वतःच त्यावर भन्नाट प्रतिक्रिया द्यायच्या. काही महिन्यांपूर्वी अदाने आजीच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात दोघींचा आपुलकीचा संवाद स्पष्ट दिसत होता.


अदा शर्मा आणि तिची आई या आजीच्या मूळ गावी म्हणजे केरळमध्ये स्मृतिसभा आयोजित करणार आहेत.


कामाच्या दृष्टीने पाहता, अदा शर्माने २००८ मध्ये ‘१९२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या कामगिरीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं आणि तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ साठी फिल्मफेअर नामांकनही मिळालं. अलीकडेच ती ‘तुमको मेरी कसम’ या चित्रपटात अनुपम खेर आणि ईशा देओलसोबत दिसली होती, मात्र चित्रपटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही.

Comments
Add Comment

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे