मुंबई हायकोर्टाकडून शिल्पा शेट्टीला दिलासा, फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील शिल्पा एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे, शिल्पा हिच्या एका फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद पार पडला. यामध्ये न्यायालयाने महत्त्वाचे आदेश देत, शिल्पा हिला मुंबई हायकोर्टाचा दिलासा दिला आहे…


काही महिन्यांपूर्वी शिल्पा हिचे काही ‘डीपफेक’ व्हिडीओ व्हायरल झाले होते. जे कोर्टाने तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले डीपफेक व्हिडिओ व फोटो संबंधित वेबसाईटवरून हटवण्यात यावेत या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अभिनेत्रीच्या संबंधित डीपफेक व्हिडिओ, फोटो आणि लिंक्स ८ दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश हायकोर्टाने संबंधित प्रतिवाद्यांना दिले आहेत. काही अज्ञात व्यक्ती आणि संकेतस्थळांनी संमतीशिवाय आक्षेपार्ह कंटेंट तयार केल्याने प्रतिमा मलिन होत असून खासगी आयुष्यावर गदा येत असल्याचा दावा करत शिल्पा शेट्टी हिने हायकोर्टात धाव घेतली होती. ज्यावर कोर्टाने निर्णय सुनावला आहे.


न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर शिल्पाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. देशमुख यांनी सुनावलेल्या निर्णायानुसार, कोणत्याही व्यक्तीची, विशेषतः महिलेची प्रतिमा अशा प्रकारे मांडली जाऊ शकत नाही जेणेकरून तिच्या सन्मानाला धक्का बसेल असं स्पष्ट करत न्यायालयाने आक्षेपार्ह डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले आहेत. सांगायचं झालं तर, फक्त शिल्पा शेट्टीच नाही तर, झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्रींचे ‘डीपफेक’ व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. ज्यामुळे अभिनेत्रींबद्दल अनेक नको त्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या, अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांचे ‘डीपफेक’ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले.


यावर झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे. रश्मिका हिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे… अशी पोस्ट सोशल मीडियावर केलेली… एवंढच नाही तर, AI ची वाईट बाजू देखील अनेक सेलिब्रिटींनी मांडलेली आहे.

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत