पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने बॅरियर ओलांडत थेट मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गामध्ये प्रवेश केला. बॅरियर ओलांडल्यावर हा ट्रक समोरून येणाऱ्या चारचाकीवर उलटला. हा धडक इतकी जबरदस्त होती की चारचाकीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात  दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.



या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी चारचाकीमधील चालकाचा समावेश आहे. तर चारचाकीमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील हा अपघात कामशेत येथे पुणे लेनवर पहाटे सुमार चार वाजता झाला.


दरम्यान, अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर तब्बल दहा किलोमीटर लांबीची वाहनरांग लागली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका