बुधवारी मुख्यमंत्री पेणमध्ये; फोडणार प्रचाराचा नारळ

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध ही पुन्हा सत्ता स्थापनेची नांदी 


स्वप्नील पाटील पेण : राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुका पार पडत असून राज्यभरात निवडणुकीच्या प्रचाराच्या आनुषंगाने विविध पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या प्रमुख सभा घेत आहेत. त्या आनुषंगाने येत्या २६ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेण पालिकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पेणमध्ये येत असल्याची माहिती पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी त्यांनी पेण अर्बन बँकेचे माजी चेअरमन शिशिर धारकर यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे यातील जे ठेवीदार मृत्युमुखी पडले आहेत त्याचे पाप ते कधीच फेडू शकणार नाहीत असे सांगितले. महायुतीचे मतदानापूर्वीच सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत ही तर पुनर्सत्ता स्थापनेची नांदी असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी आमदार रवींद्र पाटील यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर जोशी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय डंगर, पीआरपीचे जिल्हा प्रमुख सीताराम कांबळे, भाजप शहर प्रमुख रवींद्र म्हात्रे, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख जितेंद्र ठाकूर यांसह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.


पेण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी महायुती आणि पेण शहर विकास आघाडी यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने निवडणूक होणार आहे. त्यामुळे येत्या ३ तारखेला पेण शहरातील मतदार कोणाला आपले झुकते माप देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी आमदार रवींद्र पाटील यांनी मागील दहा वर्षांत पेण शहरात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला.


पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्यात पैसे अडकलेल्या खातेदारांपैकी आत्तापर्यंत पेण शहरातील चाळीसहून अधिक ठेवीदार त्या धक्क्याने मेहनतीच्या पैशाचा उपभोग न घेता आल्याने मृत्युमुखी पडले याचे हे पाप पेण अर्बन बँकेचे माजी चेअरमन शिशिर धारकर कधीच फेडू शकत नाहीत, असे देखील आमदार रवींद्र पाटील सांगितले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिताराम कांबळे यांनी आपल्या पक्षाचा महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा असल्याचे जाहीर करून तशा प्रकारचे पत्र आमदार रवींद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.


निकालाआधीच महायुतीची विजयाची मुहूर्तमेढ
पेण पालिकेच्या निवडणुकीत चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी असे एकूण पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात असताना भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचे तीन असे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पालिका निवडणुकीत निकालाआधीच महायुतीने विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे पेण शहरातील मतदारांचा महायुतीकडे कल वाढला असून या बिनविरोध झालेल्या विजयी उमेदवारांचे आमदार रवींद्र पाटील यांनी कौतुक केले आणि इतर उमेदवारांना देखील भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .