१८ मंत्र्यांची खाती जाहीर
पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी खातेवाटप जाहीर केलं आहे. नितीश कुमार यांच्यासोबत २४ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. गेल्या २० वर्षांपासून नितीश कुमार यांनी गृहमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवलं होतं. यावेळी नितीश कुमार यांनी गृहमंत्रीपद भाजपच्या सम्राट चौधरींना दिला आहे. नितीश कुमार यांनी गेल्या २० वर्षांमध्ये सत्तेत असताना गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं होतं. यावेळी बिहार सरकारमधील महत्त्वाची खाती मात्र भाजपच्या नेत्यांना देण्यात आली आहेत.
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात २४ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आतापर्यंत १८ जणांची खाती जाहीर करण्यात आली आहेत. तर, ६ मंत्र्यांची खाती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
नितीश कुमार यांनी बिहारमधील खातेवाटप जाहीर केलं आहे. गृह मंत्रालय भाजपच्या सम्राट चौधरींकडे देण्यात आलं आहे. तर, महसूल खात्यावरही भाजपचे वर्चस्व पाहायला मिळतंय. विजय कुमार सिन्हा यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं आहे. आरोग्य, कायदा, कृषी, उद्योग, सहकार, मागासवर्गीय कल्याण, अनुसूचित जाती जमाती, नगरविकास भाजपकडे देण्यात आली आहेत. लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाकडे ऊस उद्योगाहस सार्वजनिक आरोग्य नियंत्रण विभाग तर जीतन राम मांझी यांच्या हम पार्टीकडे सूक्ष्म जल संधारण खातं देण्यात आलं आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला पंचायत राज विभाग सोपवण्यात आला आहे.