हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा सुरक्षा दलाच्या कारवाईत मरा असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय गृहंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना दिला. त्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली. यानंतर देशभर नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू झाली.

सुरक्षा पथकांचा पवित्रा बघून नक्षलवादी शरण येऊ लागले. पण काही प्रमुख नक्षलवादी सरकार विरोधात सशस्त्र कारवाया सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात होते. अखेर नक्षलवाद्यांचा मोठा नेता असलेला नक्षलवादी हिडमा हा सुरक्षा पथकाच्या कारवाईत ठार झाला. हिडमा चकमकीत ठार झाल्यानंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे. बंदी घातलेल्या भाकपा माओवादी नक्षलवाद्यांच्या गटातील ३७ नक्षलवाद्यांनी एकाचवेळी शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.

शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये हिडमाचा विश्वासू सहकारी कोय्याडा सम्बैयाह उर्फ आझाद याचाही समावेश आहे. आझाद हा मुलुगू जिल्ह्याचा रहिवासी असून तो ३१ वर्षे भूमिगत राहून सरकार विरोधात कारवाया करत होता. विशेष म्हणजे शरण आलेल्या ३७ जणांपैकी २५ नक्षलवादी या महिला आहेत. शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून सुरक्षा पथकाने आठ बंदुका, एक एके ४७ रायफल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि जिवंत काडतुसे जप्त केली. ही माहिती तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी दिली.

शरण आलेले तीन प्रमुख नक्षलवादी

कोय्याडा सम्बैयाह उर्फ आजाद, अप्पासी नारायण उर्फ रमेश, मुचाकी सोमाडा उर्फ एर्रा हे तीन नक्षलवादी नेते आणि त्यांचे समर्थक आंध्र तेलंगणा सीमेवर बस्तरच्या दक्षिणेकडील भागात सक्रीय होते. या नक्षलवाद्यांनी आता शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.
Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित