परळीमध्ये महायुतीचा गुलाल! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

परळी: राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी भरलेला अर्ज मागे घेण्याची मुदतसुद्धा आता संपली आहे. त्यामुळे आता कोणते उमेदवार कोणत्या प्रभागातून उभे राहणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. तर काही ठिकाणी विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. ज्यात भाजप अव्वल स्थानावर आहे. मात्र भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीत भाजपसोडून महायुतीतील इतर दोन मित्रपक्षांचे उमेदवार विजयी झाले आहे.


बीडमधली परळी नगरपरिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीच्या दोन नगरसेवकांना गुलाल लागला आहे. ज्यात राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक १३ मधील रेश्मा बळवंत आणि प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेच्या जयश्री गीते या दोघींची नावे नगरसेवक पदासाठी बिनविरोध जाहीर झाले आहेत.




स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकूण तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत. ज्यातील पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकांना सुरूवात होईल.

Comments
Add Comment

शेत रस्त्याच्या वादात मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण

उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूद विलंब टाळण्यासाठी इमेल द्वारे पाठविण्यात येणार नोटीस •

मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील

विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले

 भोगवटादार वर्ग-२ जमिनींवरील 'गहाण शुल्क' वसुलीला कायदेशीर संरक्षण २००९ पासूनची आकारणी वैध ठरणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलेले विधेयक संमत 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी

"उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत"; परिणय फुकेंचा घणाघात

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या

सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा - सुधीर मुनगंटीवार

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेत मंत्री आाणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित नसल्याचा मुद्दा