यावर्षाचा उत्तर काळ सुरू झाला असून नवीन वर्षाच्या स्वागताला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे २०२६ वर्ष कसे असेल? यावर्षात काय होणार? याबद्दल सर्वांनाच उत्सूकता लागली आहे. भविष्य वर्तवणाऱ्या व्यक्तीसुद्धा आता यावर अभ्यास करत आहेत. प्रसिद्ध भविष्य वर्तवणाऱ्या व्यक्तींच्या नावात बल्गेरियन महिला बाबा वेंगा अव्वल स्थानावर आहे. बाबा वेंगाचे निधन झाले असले तरी २०२६ मध्ये काय होणार याबद्दल त्यांनी भविष्य वर्तवले आहे. ज्यात त्यांनी सांगितले होते की, मनुष्य पहिल्यांदाच थेट एलियन्सला भेटणार आहे. जाणून घेऊया बाबा वेंगांच्या भविष्यवाणीबद्दल सविस्तर...
बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार, २०२६ सालासाठी सर्वात महत्त्वाच्या भाकितांपैकी एक म्हणजे जगाच्या पूर्व भागात एक मोठे आणि विनाशकारी युद्ध सुरू होईल. जे हळूहळू संपूर्ण जगात पसरून यामध्ये जगाचा पश्चिम भाग सर्वाधिक प्रभावित होईल. या युद्धामुळे संपूर्ण जागतिक सत्ता परिवर्तन आणि व्यापक जीवितहानी होऊ शकते. तसेच रशियाचा एक शक्तिशाली नेता संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवू शकतो. त्याला एक वैश्विक देव मानले जाऊ शकते.
बाबा वेंगांनी नैसर्गिक आपत्तीबाबतही भाकीत केले आहे. २०२६ मध्ये लोकांना अनेक गंभीर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. एका अहवालानुसार, तिने असा दावाही केला आहे की २०२६ हे वर्ष भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींचे वर्ष असेल, ज्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल.
.
सध्या एआयचा वापर एवढा वाढला आहे की, भविष्यातील एआयचे धोकेसुद्धा बाबा वेंगांनी सांगितले आहेत. भविष्यात एआय इतके शक्तिशाली होईल की मानवांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल, असे भाकित वांगा यांनी केले आहे. एआय स्वतःहून मोठे निर्णय घेण्यास सुरुवात करेल, ज्याचा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर थेट परिणाम होईल. एआयचे हे एक पाऊल मानवी निर्मिती, यंत्र स्वायत्तता आणि सर्व नैतिक जबाबदाऱ्यांमधील रेषा पुसून टाकणारे असेल. हे भाकित सध्याच्या काळात एआयच्या वेगाने होणाऱ्या वाढीच्या चिंतेशी अगदी साम्य असल्याचे दिसते.