मोहित सोमण: ग्रो (Billionbrains Garage Ventures LLC Limited) कंपनीचा शेअर तिमाही निकालानंतर सुसाट वेगाने उसळला आहे. आज दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर होताच कंपनीचा शेअर ७% पातळीपर्यंत उसळला होता. दुपारी १२.४७ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ५.१०% उसळत १६४.७१ रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. चार दिवसांपूर्वी शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली होती. १८ नोव्हेंबरला कंपनीचा शेअर ८% पातळीवर उसळल्याने कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation)११३६८.६१ कोटींवर पोहोचले होते. त्यामुळे नुकत्याच सूचीबद्ध (Listed) झालेल्या आयपीओतील मूळ प्राईज बँड पेक्षा ९४% प्रिमियम दरासह व्यवहार करत होता काही काळासाठी विशेषतः दोन दिवसांसाठी सेल ऑफ झाल्याने काल शेअर किरकोळ घसरला असला तरी निकाल जाहीर होताच कंपनीचा शेअर भरघोस वाढला आहे. कंपनीने दिलेल्या निकालातील माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४२०.१ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४७१.३ कोटींवर वाढ झाली आहे. त्यामुळे करोत्तर नफा १२% वाढला आहे कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५६९.९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ६३८.१ कोटीवर वाढ झाली आहे.
निकालातील माहितीनुसार, तिमाही बेसिसवर (Month on Month MoM) गेल्या तिमाहीतील करोत्तर नफ्यात ३७८.३ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४७१.३ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीच्या बॉटम लाईनमध्ये (Income) मध्ये ३४.६ कोटींच्या तुलनेत ५२ कोटींवर वाढ झाली आहे.
इयर ऑन इयर बेसिसवर ईबीटा (EBITDA) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५५० कोटींवरून या तिमाहीत ९.७% वाढून ६०३.३ कोटी झाला आहे तसेच तिमाही बेसिसवर २५% वाढला आहे. तर मार्जिन गेल्या वर्षीच्या ४८.९% वरून ५९.३% आणि जून तिमाहीत ५३.४% पर्यंत वाढले आहे. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल (Revenue from Operations) वर्षानुवर्षे ९.५% कमी होऊन ११२५.३ कोटींवरून १०१८.७ कोटीवर किरकोळ घसरला आहे जरी तो मागील तिमाहीपेक्षा १२.७% वाढला. सप्टेंबर २०२५ पर्यंत ईपीएस (Earning per share EPS) ०.२५ रूपये आहे जो गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत ०.२३ रूपया होता.
आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत बाजार हिस्सा (Market Share) २५.६% वरून २६.६% पर्यंत वाढला असताना कंपनीने म्हटले आहे की खर्चात एकूण घट झाली आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या खर्चात ९% घट झाली आहे.