T20 World Cup 2026: जाणून घ्या भारताच्या सुपर ८ सामन्यांचे वेळापत्रक; कोणत्या संघासोबत कधी होणार मुकाबला

मुंबई: आयसीसीच्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. सलग चार विजयांसह, भारताने सुपर ८ मध्ये थेट प्रवेश केला आहे. आता, ही स्पर्धा एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. यापुढील प्रत्येक सामना त्या-त्या संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.


दरम्यान, सुपर ८ मध्ये टीम इंडियाचा सामना कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध होईल ते जाणून आपण जाणून घेऊया. सुपर ८ ग्रुप १ मध्ये भारतासोबत झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पोहोचले आहेत. या चारही संघांमधील स्पर्धा अत्यंत रोमांचक होणार आहे.


भारताचा पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होईल. भारताची सुपर ८ मोहीम हाय-व्होल्टेज मुकाबल्याने सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना महत्त्वाचा असेल. अहमदाबादची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सुरुवातीचे षटके निर्णायक ठरू शकतात.


भारताचा दुसरा सुपर ८ सामना झिम्बाब्वेविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताच्या फिरकी आक्रमणासाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते, तर झिम्बाब्वे देखील जोरदार लढाई करण्याचा प्रयत्न करेल. पॉइंट टेबल मजबूत करण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा मानला जातो.


ऐतिहासिक कोलकाता मैदानावर पुन्हा एकदा मोठी लढाई क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळेल. भारत १ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा सुपर ८ सामना खेळेल. वेस्ट इंडिजच्या स्फोटक फलंदाजीविरुद्ध भारताच्या गोलंदाजीची खरी परीक्षा होईल. गट १ चे चित्र येथे पूर्णपणे स्पष्ट होऊ शकते.


तर इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका गट २ मध्ये आमनेसामने येतील. पाकिस्तान कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध सुपर ८ मोहिमेची सुरुवात करेल.


नॉकआउट टप्प्यातील सामने ४ आणि ५ मार्च रोजी खेळले जातील, अंतिम सामना ८ मार्च रोजी होणार आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आले आहेत.


सलग चार विजयांमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे, पण आता खरे आव्हान सुपर ८ मध्ये विजयाची मालिका टिकवून ठेवण्याचे आहे. जर हीच गती कायम राहिली तर भारतासाठी उपांत्य फेरीतील स्थान फार दूर नाही. भारतीय चाहते आता २२ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेव्हा टीम इंडिया सुपर ८ मध्ये आपल्या एका नवीन खेळीची सुरुवात करेल.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)