सोसायटीच्या परवानगीविना विकासकाला मजला वाढविण्याची परवानगी

बांधकाम परवानगी रद्द करण्याची रहिवाशांची मागणी


कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली पालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. कल्याण, प.येथील नीरज रीवेरीया शंतनू कॉ. ऑप. हौसिंग सोसायटीच्या परवानगीशिवायच पालिकेने विकासकाला या इमारतीवर आणखी एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. २०१७ साली सहा मजले बांधून पूर्ण झालेली इमारत अवघ्या ८ वर्षांत कमकुवत झाली. असे असताना आणखी एक मजला वाढविण्यासाठी दिलेली परवानगी रहिवाशांसाठी धोकायदायक असून बांधकाम करताना एखादी दुर्घटना घडल्यास जवाबदारी केडीएमसी घेणार का असा प्रश्न करत केडीएमसीने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. विकासक पोलिसांचे दबाबतंत्र वापरत आहे.


कल्याण, प. येथील गोदरेज हिल परिसरात ही सोसायटी आहे. २०१७ साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तेथे लोक राहण्यास आले. आता या इमारतीला जवळपास ८ वर्षे पूर्ण झाली. इमारत कमकुवत होऊन दरवाजाच्या चौकटी निघत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अशी परिस्थिती असताना विकासकाने आणखी एक मजला बांधण्यासाठी केडीएमसीकडे परवानगी मागितली. मात्र सोसायटीची परवानगी नसताना, सोसायटीची 'ना हरकत प्रमाणपत्र' नसतानादेखील केडीएमसीने पाचवा मजला अधिक सातवा मजला असा एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या रहिवाशांनी केडीएमसीच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.


विशेष म्हणजे विकासकाने पाचव्या मजल्याचे यापूर्वी संपूर्ण बांधकाम केले असतानादेखील पाचव्या मजल्याची परवानगी देण्यात आली. तत्कालीन आयुक्त विजय सूर्यवंशी, नगररचनाकार सावंत यांनी जोपर्यंत सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत बांधकाम परवानगी देणार नाही अशी मौखीक व लेखी आदेश संबंधी नस्तीमध्ये नमूद असताना केडीएमसीकडून परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. ही सोसायटी नोंदणीकृत असतानाही विकासकाने कागदपत्रे, खोटा ना हरकत दाखला देऊन केडीएमसीची दिशाभूल केल्याचा आरोप सोसायटीच्या सचिव रेश्मा बांगर यांनी केला आहे. याबाबत केडीएमसी आयुक्तांचीदेखील या रहिवाशांनी भेट घेतली मात्र आयुक्तांनी याबाबत माहिती घेऊन सांगू असे उत्तर देत नगररचना विभागाकडे जाण्यास सांगितले. मात्र नगररचना विभाग आपल्या परवानगीवर ठाम आहे.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या