मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. आयोगाने ही घोषणा करुन काही दिवस होत नाहीत तोच राज्यातील एका गावाने मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. गावात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट उपलब्ध नाही. यामुळे २१ व्या शतकाला अनुसरुन दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. जगाशी संपर्क ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी तक्रार करुन ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट द्या मगच मत मिळवा, अशी ठाम भूमिका तळवडेतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. नो नेटवर्क, नो एंट्री अशी ठाम भूमिका तळवडेतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे.गावकऱ्यांच्या भूमिकेला राजकीय पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

भारताच्या लेकींची सुवर्ण हॅटट्रिक!

जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच' नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत

शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक

मुंबईतील स्वच्छतागृह होणार चकाचक आणि दुर्गंधीमुक्त सचिन धानजी मुंबई : मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई  : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व