पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे ‘असंभव’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यांची अभिनयातील प्रगल्भता आणि विविध भूमिकांचा अनुभव यामुळे या चित्रपटात काहीतरी दर्जेदार पाहायला मिळणार असल्याचा विश्वास प्रेक्षक व्यक्त करत आहेत. ‘असंभव’मध्ये कलाकारांइतकीच ताकद निर्मिती विभागातही आहे.


अनुभवी निर्माते, सहनिर्माते एकत्र आल्याने हा प्रकल्प भक्कम पाया घेऊन उभा राहिला आहे. सदर चित्रपट हा येत्या रविवारी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पनवेल येथील ओरायन मॉल येथे असलेल्या पीव्हीआर मध्ये मोठ्या थाटात पदर्शित होत असून पनवेलकरांना त्याची उत्कंठा लागली आहे.


मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Comments
Add Comment

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित

हेमंत ढोमे यांच्या शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील

हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात

‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला!

मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाची तालीम थेट हैदराबादला