नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष चौकशी समितीच्या अहवालातून समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र संचालक म्हणून कार्यरत असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित या व्यवहारात नोंदणी करताना नियमबाह्य पद्धतींचा अवलंब करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः, दस्त नोंदविताना जुन्या आणि वापरात नसलेल्या सातबारा उताऱ्याचा उपयोग करण्यात आला, तसेच ई-फेरफार (ई-म्युटेशन) प्रक्रिया टाळल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय, जमिनीचे स्वरूप स्थावर असताना ती जंगम मालमत्ता म्हणून नोंदविली गेल्यामुळेही संशय निर्माण झाला आहे.


या जमिनीबाबत ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजयसिंह पाटील आणि जागेचे कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात खरेदी-विक्री करार झाला होता. मात्र संबंधित जमीन शासकीय स्वरूपाची आणि महार वतनात समाविष्ट असल्यामुळे तिची विक्री किंवा हस्तांतरण करणे नियमांनुसार मान्य नाही. या व्यवहाराची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण प्रकरणावर चौकशीची आवश्यकता भासली आणि त्यासाठी नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली. या समितीने तयार केलेला अहवाल नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करण्यात आला असून, निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या वर्तनाबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.


अहवालात म्हटले आहे की, दस्त नोंद करताना संबंधित भूखंडाचा अधिकृत ऑनलाइन सातबारा उतारा तपासणे अत्यावश्यक असतानाही, ते न करता अप्रचलित सातबारा दस्ताशी जोडण्यात आला. तसेच, उद्योग संचालनालयाकडून आवश्यक पात्रता प्रमाणपत्र नसतानाही मुद्रांक शुल्क सवलत मिळवून नोंदणी करण्यात आली. दस्ताची ई-म्युटेशन प्रक्रियेसाठी पाठवणी करताना स्थावरच्या जागी जंगम मालमत्ता हा पर्याय निवडण्यात आला, आणि संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ‘ऑफलाइन’ स्वरूपात हाताळण्यात आली.


‘सर्व्हेअर’ यंत्रणेत अडचणी आल्यास नागरिकांना पर्याय म्हणून ऑफलाइन दस्त नोंदणीची सुविधा उपलब्ध असते. मात्र, या प्रकरणात त्या सुविधेचा वापर प्रत्यक्षात नियमांचं उल्लंघन करण्यासाठी झाल्याचे समितीने स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर, या व्यवहारात लक्षणीय अनियमितता झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु आहे.

Comments
Add Comment

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली

लातूरचे नवोदय विद्यालय हादरलं; वसतिगृहात विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत

लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Buldhana : बुलढाण्याचा अडीच वर्षांचा चिमुकला ठरला 'गुगल बॉय', फक्त २ मिनिटांत ७१ देशांच्या राजधान्या तोंडपाठ

'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये कोरले नाव बुलढाणा : ज्या वयात मुले अडखळत शब्द बोलू लागतात, त्याच वयात बुलढाणा