शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला कंटाळून दिल्लीतील मेट्रो स्थानकावरून उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी शौर्यच्या शाळेतील प्राचार्यांसह तीन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


शौर्य पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा रहिवासी होता. त्याचे वडील प्रदीप पाटील सोने-चांदी गाळण्याच्या व्यवसायानिमित्त कुटुंबासह अनेक वर्षांपासून दिल्लीतील राजीव नगर भागात राहतात. शौर्य इथल्या सेंट कोलंबस या शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता.१८ नोव्हेंबरला शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून खाली उडी मारली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्याला रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


घटनेमागील कारण


शौर्यच्या स्कूल बॅगमध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये त्याने स्पष्टपणे नमूद केले आहे की, तो अनेक दिवसांपासून शाळेतील काही शिक्षकांच्या मानसिक छळाला, अपमानाला आणि दबावाला कंटाळला होता. नोटमध्ये त्याने आपले नाव, पालकांना दिलगिरी, तसेच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या आत्महत्येसाठी त्याने संपूर्णत: शिक्षकांना दोषी ठरवले आहे.


या नोटच्या आधारावर पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल, तसेच शिक्षक मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली वर्गीस यांच्यावर मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेदरम्यान शौर्यचे वडील गावाकडे गेले होते. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. शौर्यचा अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी ढवळेश्वर येथे करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”: