डिसेंबर २०२६ पर्यंत सेन्सेक्स १०७००० पातळी पार करणार - मॉर्गन स्टॅनले

प्रतिनिधी: अर्थशास्त्रातील नव्या संचरनेसह अर्थव्यवस्थेतील व शेअर बाजारातील तेजीचे नवे संकेत मिळत असल्याचे 'इंडिया स्ट्रॅटेजी' या नव्या अहवालात मॉर्गन स्टॅनले जागतिक गुंतवणूक रिसर्च संस्थेने म्हटले आहे. 'सेन्सेक्स डिसेंबर २०२६ पर्यंत १०७००० पातळी पार करेल व बेस लाईन टार्गेट किमान ९५००० पातळी असेल' असे अहवालात म्हटले गेले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२८ या कालावधीत कंपाऊंड ग्रोथ (वाढ) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १९% वाढेल असे म्हटले गेले आहे. घरगुती गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील वाढवलेली गुंतवणूक स्थितप्रज्ञच राहिल व आहे त्याच वेगात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक न राहता ती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. दरम्यान संस्थेचे विश्लेषक रिधम देसाई, नयंत पारेख यांनी नाममात्र वाढीत (Nominal Growth) व कॉर्पोरेट उत्पन्नात मजबूत वाढ पुन: प्राप्तीसाठी मधल्या सायकल मंदीनंतर झालेले धोरणात्मक बदल वाढ करतील असे स्पष्ट केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून आरबीआयच्या, बँकिंगच्या, वित्त मंत्रालयाने केलेल्या सकारात्मक धोरणात्मक बदलांचा परिणाम आर्थिक निकालात भविष्यात होऊ शकतो. रेपो दरासह सीआर आर दरात (Cash Reserve Ratio CRR), जीएसटी दरातील कपात इत्यादी मुद्दे अर्थकारणातील वाढीसाठी व अंतिमतः शेअर बाजारातील वाढीसाठी मूलभूत ठरतील असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. 'चीनसोबतच्या संबंधांमध्ये होणारी घसरण आणि चीनची घुसखोरीविरोधी मोहीम या तेजीच्या मिश्रणात भर घालत आहे. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भावना आणखी वाढतील. अशाप्रकारे, कोविडनंतरचा भारताचा आक्रमक मॅक्रो सेटअप आता उलगडत आहे'असेही मॉर्गन स्टॅनलीने एका अहवालात नमूद केले आहे.


'आमच्या बेस केसमध्ये, येत्या आठवड्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ परिस्थितीवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. आम्ही अल्पकालीन व्याजदरांमध्ये आणखी २५ बेसिस पॉइंट्स (bps) कपात आणि सकारात्मक तरलता वातावरण हे चलनविषयक धोरणासाठी बेस केस म्हणून वापरतो' असे नयंत पारेख व अहवालात मॉर्गन स्टॅनलीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य भारतीय इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट रिधम देसाई यांनी लिहिले आहे.


अहवालात पुढे म्हटले आहे की,भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार परिस्थितीत घट, आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये सेन्सेक्सच्या कमाईचा दर वार्षिक १५% राहू शकतो मात्र आर्थिक वर्ष २६ मध्ये बाजारातील कमी झालेली वाढ आणि खराब मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती विशेषतः भूराजकीय परिस्थिती दर्शविणारे इक्विटी मल्टीपल डीरेट मधील घटक देसाईंच्या मते बाजारातील घसरण वाढवू शकतात आणि डिसेंबर २०२६ पर्यंत सेन्सेक्स सध्याच्या पातळीपासून सुमारे १०% कमी होऊन ७६००० पातळीवर बेसलाईनवर पोहोचू शकतात असे म्हटले आहे.


तेजीच्या बाबतीत (३०% शक्यता Upside) धरल्यास प्रति बॅरल तेल $६५ पेक्षा कमी राहिल्यास रिफ्लेशन धोरणांमुळे मजबूत वाढ होईल आणि जागतिक व्यापार तणाव कमी होईल असे गृहीत धरले तर सेन्सेक्सचे लक्ष्य १०७००० पातळीवर ठेवले आहे. आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये उत्पन्न वाढ दरवर्षी १९% वाढण्याची अपेक्षा आहे.' असेही अहवालाने नमूद केले आहे.


तर मंदीबाबत भाकीत नोंदवताना, 'मंदीच्या बाबतीत (२०% Downside शक्यता), सेन्सेक्सचे लक्ष्य ७६००० आहे, प्रति बॅरल $१०० पेक्षा जास्त तेलाचा समावेश, मॅक्रो स्थिरता राखण्यासाठी आरबीआयचे कडक नियमन, अमेरिकेच्या मंदीसह जागतिक मंदी, भारत-अमेरिका व्यापार संबंध बिघडणे आणि इक्विटी मल्टीपलचे डी-रेटिंग अशा गोष्टीचा परिणाम होऊ शकतो या परिस्थितीत, आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये सेन्सेक्सच्या उत्पन्नात दरवर्षी १५% वाढ होण्याचा अंदाज आहे, तर आर्थिक वर्ष २६ मध्ये वाढ कमकुवत होईल.' असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

अनिल अंबानी यांच्या आणखी १४०० कोटींची मालमत्ता जप्त ईडीकरून आणखी एक धक्कादायक कारवाई

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांची आणखी १५०० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचनालय (Enforcement ED) संस्थेने जप्त केली आहे.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

एसीएमई सोलारकडून १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पातील पुढील १६ मेगावॅटचा दुसरा टप्पा सुरू

गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

सहकारी संस्थांना ९२५०० कोटींचा निधी वितरित - अमित शहा

नवी दिल्ली: एनसीडीसीने गेल्या आर्थिक वर्षात सहकारी संस्थांना ९२५०० कोटी रुपये वितरित केले आहेत' असे वक्तव्य