अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेकडून ठेवी परत न मिळाल्याने तब्बल १६ हून अधिक ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आहे. या तक्रारींमध्ये, संस्थेने परतावा न देता आर्थिक विश्वासघात केल्याची माहिती ठेवीदारांनी दिली आहे. तक्रारदार विलास महादेवराव हनुमंते यांनी केलेल्या विस्तृत तक्रारीत संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष तुषार हुने, उपाध्यक्ष निलेश गावंडे, तसेच सदस्य प्रकाश जोशी आणि राजीव गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
तक्रारीनुसार, ठेवीदारांनी जमा केलेली रक्कम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने वापरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचे सांगितले. संस्थेकडून कोणताही स्पष्ट हिशोब न देणे, ठेवी परत न करणे आणि चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे ठेवीदारांचा रोष वाढला. या प्रकरणामुळे संस्थेच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. मिळालेल्या प्राप्त तक्रारींच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक पडताळणी पूर्ण करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया गतीने सुरू केली आहे.
लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ...
पोलिसांचे पथक संबंधित कागदपत्रे, व्यवहार नोंदी आणि संस्थेच्या आर्थिक हालचालींची तपासणी करत असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. दरम्यान, स्वतःच्या आयुष्यभराची बचत संस्थेत जमा केलेल्या अनेक ठेवीदारांमध्ये मोठी चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा वेगाने तपास होऊन ठेवीदारांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत गुंतवणूक करणारे ठेवीदार सर्व सामन्य वर्गातील आहेत. त्यामुळे छोटी रक्कम बुडणे हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजेत अशी मागणी ते करत आहे.