नितीश कुमारांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

सम्राट चौधरी, विजय सिन्हा सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदी


पाटणा (वृत्तसंस्था) : नितीश कुमार यांनी गुरुवारी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यानंतर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसेच भाजप आणि एनडीएच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी २४ अन्य मंत्र्यांना शपथ दिली.


नितीश यांची प्रदीर्घ राजकीय वाटचाल


७४ वर्षीय नितीश कुमार यांनी नोव्हेंबर २००५ पासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. याला अपवाद २०१४-१५ मधील केवळ नऊ महिन्यांचा कालंखड आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही नितीश कुमार यांच्यासाठी एक महत्त्वाची परीक्षा म्हणून पाहिली जात होती. त्यांनी रालोआला अभूतपूर्व यश मिळवून देत पुन्हा एकदा सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. जद(यू)चे प्रमुख नितीश कुमार यांची बुधवारी पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाली होती.


चिराग यांच्या पक्षातील दोन आमदार मंत्री


चिराग यांच्या पक्षाचे संजय कुमार पासवान आणि संजय सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संजय कुमार पासवान हे बखरी येथून आमदार आहेत, तर संजय सिंह हे महुआ येथून आमदार आहेत. त्यांनी लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप यांचा पराभव केला.


प्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष


प्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष होतील. या मुद्द्यावर जेडीयू आणि भाजपमध्ये एक करार झाला आहे. डॉ. प्रेम कुमार हे गया टाउन विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा आमदार झाले आहेत. १९९० पासून ते गया टाउनची जागा सतत जिंकत आहेत. प्रेम कुमार यांनी बिहार सरकारमध्ये आरोग्य अभियांत्रिकी, रस्ते बांधकाम आणि शहरी विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे.


२६ मंत्र्यांपैकी ३ महिला, ११% वाटा


नितीश यांच्या मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांपैकी तीन महिला आहेत. टक्केवारीच्या बाबतीत, महिला मंत्रिमंडळात ११ टक्के आहेत. लेशी सिंह, रमा निषाद आणि श्रेयसी सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध हॅट्ट्ट्रिक

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम! जामनेर : जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे १० नगरसेवक फुटणार ?

भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याची शक्यता पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची

महाआघाडीत खळबळ; भाजपकडून ‘स्वबळा’ची भूमिका ?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भाजपने स्वबळावर पुढे जाण्याचे संकेत पुन्हा स्पष्ट केल्यानंतर

माजी गृहमंत्र्यांचा मुलगा भाजपच्या वाटेवर ?

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

दिल्लीभेटीत भाजपच्या शिवसेनाविरोधी ऑपरेशन लोटसवर आक्षेप?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जावून त्यांनी

अमित शाहांशी बोलले एकनाथ शिंदे, महायुतीतला संघर्ष टाळण्यासाठी केली चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.