हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा पुन्हा चर्चेत; व्हायरल फोटोंनी वाढवल्या अफवा

मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री महिका शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या, दोघांचे एकत्र फोटो व्हायरल होऊ लागले. हार्दिक आणि महिका एकत्र फिरताना दिसू लागल्यापासूनच चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्यावरून संशय व्यक्त केला जात होता.


यातच आता हार्दिकने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘बिग 3’ नावाने तीन फोटो शेअर केले, ज्यात महिका, त्याचा मुलगा अगस्त्य आणि त्याचा पाळीव कुत्रा दिसत आहेत. या फोटोंमध्ये हार्दिक आणि महिका एकमेकांच्या जवळ दिसत असल्याने चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला आहे.



साखरपुड्याच्या चर्चांना उधाण


एका फोटोने तर साखरपुड्याच्या चर्चांना चांगलीच हवा दिली आहे. त्या फोटोमध्ये दोघे एकत्र प्रार्थना करताना दिसतात आणि महिकाच्या बोटातील रिंगने साऱ्यांचे लक्ष गेले.आणखी एका फोटोमध्ये हार्दिक महिकाच्या गालावर किस करताना दिसतोय, तर काही फोटोमध्ये हे कपल पारंपारिक पोशाखात पूजा करताना दिसले. मात्र दोघांनीही या अफवांवर अद्याप काही भाष्य केलेले नाही.



हार्दिक आणि महिकाची जवळीक कशी वाढली?


नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक आणि महिकामधील जवळीक वाढू लागली. हार्दिक आणि नताशाचे लग्न तब्बल चार वर्ष टिकले असून दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. पण त्यांनी २०२४ मध्ये त्यांनी दोघांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.


घटस्फोटानंतर काही दिवस हार्दिकचे नाव अभिनेत्री जास्मिन वालियाशी जोडले गेले होते. मात्र त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला जेव्हा हार्दिकने महिकाच्या वाढदिवशी तिच्यासोबतचे फोटो शेअर केले. यापूर्वीही हे जोडपे सुट्टीसाठी एकत्र गेलेले फोटो शेअर करून चर्चेत आले होते. ऑक्टोबर महिन्यात दोघे मुंबई विमानतळावर दिसले, तेव्हाच ते पहिल्यांदा चर्चेत आले.



महिका शर्मा विषयी


२४ वर्षीय महिका शर्मा ही मॉडेल आणि अभिनेत्री असून फॅशन आणि फिटनेसविषयीचे कंटेंट सोशल मीडियावर शेअर करते. रॅपर रागाच्या म्युझिक व्हिडिओमधून ती चर्चेत आली. तिने ऑरलँडो वॉन आइन्सीडेल यांच्या ‘इनटू द डस्क’ आणि ओमंग कुमार दिग्दर्शित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात लहान भूमिका केल्या आहेत. महिकाने अनेक नामांकित डिझायनर्ससाठी मॉडेलिंग केले आहे. ती लीन सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट सर्टिफाइड असून अॅडव्हान्स योगा इन्स्ट्रक्टरचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे.

Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करून ‘गूगल लोकेशन’ एका महिन्यात उपलब्ध करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शासनाला निर्देश

नागपूर : विधान परिषदेत आ.मिलिंद नार्वेकर यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातात नागरिकांच्या

शेत रस्त्याच्या वादात मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण

उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूद विलंब टाळण्यासाठी इमेल द्वारे पाठविण्यात येणार नोटीस •

मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील

विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले

 भोगवटादार वर्ग-२ जमिनींवरील 'गहाण शुल्क' वसुलीला कायदेशीर संरक्षण २००९ पासूनची आकारणी वैध ठरणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलेले विधेयक संमत 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी

"उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत"; परिणय फुकेंचा घणाघात

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या