आकडेवारीच समोर - परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भारतातील गुंतवणूकीत १४ महिन्यातील नवा उच्चांक प्रस्थापित

प्रतिनिधी: भारतीय शेअर बाजारात टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या मोठ्या प्रमाणात तेजी दिसत आहे. युएस बाजारात घसरणीचा कौल असताना व्याजदरात कपात होईल का याविषयीही संभ्रमाचे वातावरण आहे अशातच भारतीय बाजारातील फायदा लेवरेज करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील आपल्या रोख गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या सहामाहीत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs)भारतीय सिक्युरिटीजमधील त्यांची होल्डिंग्ज पहिल्यांदाच चौदा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर (All time High) पोहोचवली आहे. पोहोचली, जरी याच काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शेअर्सची विक्री सुरू ठेवली असली तरीसुद्धा एनएसडीएलने दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत परदेशी गुंतवणूकदार (FPIs) च्या मालमत्ता गुंतवणूक ८१.५३ ट्रिलियन रुपयांवर पोहोचल्या आहे. सप्टेंबर 2024 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे असे एनएसडीएलने म्हटले.


एफपीआयकडून यापैकी ७४.२८ ट्रिलियन रुपये इक्विटीमध्ये गुंतवले गेले असून तर उर्वरित रक्कम कर्ज आणि हायब्रिड इन्स्ट्रुमेंट्समध्ये ठेवण्यात आल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवण्यात आला आहे. परकीय गुंतवणूकीत वाढ अशा वेळी झाली जेव्हा भारतीय बाजारपेठा मजबूत होत होत्या असेही अहवालात नमूद करण्यात आले. एकूणच महिन्याच्या पहिल्या सहामाहीत त्यांनी सुमारे ३१६६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली परंतु सुमारे २६९३ कोटी रुपयांचे कर्ज खरेदी केले आहे.ऑक्टोबरमध्ये झालेल्या जोरदार खरेदीनंत या महिन्यात हा बदल झाला आहे जेव्हा एफआयआयंनी शेअर्समध्ये १०२८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि कर्जात १६१२४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार, प्रवाहात तीव्र फरक दिसून आला. होता असेही अहवालात म्हटले आहे.


उपलब्ध माहितीनुसार,ऑक्टोबरमध्ये व्यापक बीएसई( BSE) मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी अनुक्रमे ४.७% आणि ३.२% वाढ नोंदवली केली. यापूर्वी एकूण भागभांडवल जास्त असूनही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात सावधगिरी बाळगली होती‌


विश्लेषकांचे म्हणणे आहे की भारत-अमेरिका व्यापार तणाव कमी होण्याची अपेक्षा, मजबूत कॉर्पोरेट कमाई आणि स्थिर आर्थिक परिस्थितीमुळे भारतीय शेअर्सना नवीन आधार मिळत आहे. धोरणात्मक उपाययोजनांमुळे वाढीला पाठिंबा मिळत असल्याने एफआयआय विक्रीचा दबाव आणखी कमी होऊ शकतो असे त्यांचे मत आहे. जीएसटी दरात कपात, जूनमध्ये रेपो दरात मोठी कपात आणि एस अँड पीने भारताच्या सार्वभौम रेटिंगमध्ये सुधारणा करणे यासारख्या अलीकडील पावलांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की येत्या काही महिन्यांत हे घटक भारतीय बाजारपेठेत अधिक परदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन देऊ शकतात.


नोव्हेंबरच्या पहिल्या सहामाहीत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही १.५% पातळीवर वाढले होते. विशेषतः ऑक्टोबरपासूनची दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांनी प्रत्येकी ४.५% वाढ नोंदवली होती.


अहवालातील माहितीनुसार, आयटी शेअर्समध्ये सर्वात जास्त एफआयआयचा परतावा (Returns) दिसून आला, ज्यामध्ये ४८७३ कोटी रुपयांचा निधी बाहेर गेला. ग्राहक सेवांमधून सुमारे २९१८ कोटी रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली, तर आरोग्यसेवा आणि वीज या प्रत्येकी क्षेत्रांमधून सुमारे २५०० कोटी रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली होती. एफएमसीजी आणि वित्तीय सेवांमध्येही सुमारे २००० कोटी रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. ग्राहकोपयोगी वस्तू, सेवा, रसायने आणि ऑटोमोबाईल्ससह इतर क्षेत्रातून कमी प्रमाणात पैसे काढले गेले आहेत.

Comments
Add Comment

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा पुन्हा चर्चेत; व्हायरल फोटोंनी वाढवल्या अफवा

मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री महिका शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच

फिजिक्सवाला गुंतवणूकदारांना बाजारात धोका एका दिवसात १०००० कोटी बाजार भांडवल खल्लास! दोन दिवसांत २३% शेअर कोसळला

मोहित सोमण: फिजिक्सवाला शेअरमध्ये दोन दिवसात २३% घसरण झाली आहे. काल शेअर ८% आज १५% कोसळला आहे. प्रामुख्याने

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

अनिल अंबानी यांच्या आणखी १४०० कोटींची मालमत्ता जप्त ईडीकरून आणखी एक धक्कादायक कारवाई

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांची आणखी १५०० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचनालय (Enforcement ED) संस्थेने जप्त केली आहे.