मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला. व्यावसायिक कारमध्ये बसलेला असताना गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यात दोन गोळ्या व्यावसायिकाच्या पोटात लागल्याची माहिती आहे या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. फ्रेंडी दिलीमा भाई असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. कांदिवली चारकोप परिसरात असलेल्या बंदर पाखाडी येथील पेट्रोल पंपासमोर बुधवारी दुपारी ही घटना घडली होती.
मिळलेल्या माहितीनुसार, फ्रेंडी दिलीमा भाई हे कारमध्ये बसलेले होते, त्याचवेळी दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन तीन राऊंड फायर करण्यात आले. दोन गोळ्या फ्रेंडी भाई यांच्या पोटात घुसल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याची महती पोलिसांनी दिली.
फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. सध्या पोलीस गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.