Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, या वादाचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली होती. या शक्तिप्रदर्शननंतर लगेचच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुतीतील आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराजी दूर करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांकडून चर्चा झाली असली, तरी शिंदे गटाचे समाधान झाले नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, फडणवीस यांच्या भेटीनंतर अवघ्या दोनच दिवसांनी म्हणजेच आज, एकनाथ शिंदे थेट दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि महायुतीतील जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावावर या दोन नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा झाली. या दिल्लीवारीमुळे महायुतीतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वादावर चर्चा केली. दिल्लीतील भेटीगाठी संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बिहार दौऱ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे, कारण बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या. बिहारमध्ये एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा दौरा राष्ट्रीय स्तरावर एनडीएच्या घटकांशी असलेले आपले संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा ठरू शकतो. महायुतीतील वाद आणि जागावाटपाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली आणि त्यानंतरचा बिहार दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.



बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांची वाढती नाराजी


राज्याच्या सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या अंतर्गत कलह टोकावर पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाढती नाराजी घेऊन दिल्लीला रवाना झाल्याचे कळताच, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीने वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत प्रामुख्याने शिवसेना पक्षातील (शिंदे गट) मंत्री आणि एकनाथ शिंदे यांची वाढत असलेली नाराजी कशी दूर करायची, यावर सविस्तर चर्चा झाली. एवढेच नाही, तर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत गेलीच, तर पुढील राजकीय पाऊल काय असावे या संभाव्य परिस्थितीवर देखील दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. त्यामुळे, महायुतीत तीनही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. राजकीय वातावरण तापलेले असताना, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मात्र नाराजीच्या चर्चांवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. "आमच्यात कुठलीही नाराजी नाही, कुटुंब म्हटल्यावर थोडं फार होतच असतं," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी या नाराजीच्या चर्चांवर बोलणे पूर्णपणे टाळले होते.

Comments
Add Comment

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा

Emergency Flight Landing : दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग; १५४ प्रवासी सुरक्षित

लखनौ येथे आज म्हणजेच शनिवार ११ एप्रिल सकाळी दुबईहून काठमांडूकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या फ्लाइटचे (एफजेड-1133)

Voters : एसआयआरमध्ये देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली

नवी दिल्ली : विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर देशातील 9 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ