मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल २ लाख ३२ हजार कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली. ही विकास कामे पूर्ण करण्यासाठी मुदत ठेवीतील रक्कम पडणार असून यासाठी शासनाच्या विविध प्राधिकरण आणि मंडळाकडे थकीत रक्कमांचा आकडा वाढतच जात आहे. मुंबई महापालिकेचे विविध प्राधिकरणांकडे गेल्या अनेक वर्षांपासून तब्बल ३,२८३ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी प्रलंबित आहे. मात्र ही हजारो कोटींची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाला अपयशच येत आहे.
शासनाकडील विविध उपक्रम आणि मंडळाकडे असलेल्या या एकूण ३,२८३ कोटी थकबाकीमध्ये, सर्वाधिक १,६३२ कोटी रुपये एवढी थकबाकी ही एमएमआरडीएकडे प्रलंबित आहे. त्यापाठोपाठ, म्हाडाकडे ५७७ कोटी रुपये, केंद्र सरकारकडे ४५९ कोटी रुपये, राज्य सरकारकडे ४३१ कोटी रुपये, पोलीस आयुक्त विभागाकडे ११८ कोटी रुपये थकीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
जीएसटी पाटीपाठ मुंबई महापालिकेचे दुसरे उत्पन्नाचे स्रोत आहे मालमत्ता कर. मात्र महापालिकेची मालमत्ता थकबाकी पोटी विविध प्राधिकरणांकडे गेल्या काही वर्षांपासून तब्बल ३,२८३ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित राहिली आहे. ही सर्व थकबाकी वसूल झाल्यास पालिकेला विविध प्रस्तावित, नियोजित प्रकल्प, योजना, विकासकामे यांसाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे.
पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी पेटवत आहेत. मात्र थंडीच्या दिवसात पुणे ...
शासनाच्या विविध प्राधिकरणांकडील थकबाकीची आकडेवारी
-----------------------------------------------
क्र. प्राधिकरण थकीत रक्कम
(कोटीत)
१) एमएमआरडीए १,६३२.००
२) म्हाडा ५७७. ७८
३) केंद्र सरकार ४५९.७९
४) राज्य सरकार ४३१.५६
५) पोलीस आयुक्त ११८.९६
६) बी.पी.टी. ५०.५७
७) पश्चिम रेल्वे ०६.८९
८) मध्य रेल्वे ०६.११
एकूण रक्कम ३२८३.६८