गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर असलेल्या कोलकातातील इडन गार्डन या खेळपट्टीवर टीम इंडियाची खेळी कमी पडली. मात्र आता भारतीय संघाला ही मालिका गमावायची नसेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा कसोटी सामना जिंकावाच लागणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा कसोटी सामना गुहावटीमध्ये होणार आहे.


भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा आणि अंतिम सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत होणार असून पहिल्या सामन्यापेक्षा काही मिनिटं आधी दुसर्‍या सामन्याला सुरुवात होणार आहे. कोलकातात पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली होती. मात्र कोलकाताच्या तुलनेत गुवाहाटीत ३० मिनिटांआधी नाणेफेक आणि सामना सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजे ९ वाजता सामना सुरु होणार आहे. तर त्याआधी ८ वाजून ३० मिनिटांनी टॉस होईल.





कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत आधी लंच ब्रेक आणि नंतर टी ब्रेक होतो. मात्र गुवाहाटीत यंदा ही परंपरा बदलणार असून आधी टी ब्रेक आणि नंतर लंच ब्रेक होणार आहे. कसोटी सामन्यांच्या इतिहासात लंचआधी टी ब्रेक होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे चाहते गुवाहाटीतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहेत.


भारतीय संघावर पहिल्या सामन्यातील पराभवामुळे जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे आता भारतीय संघ कसोटीचा दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेसोबत बरोबरीचा हिशोब करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात कोणत्या रणनितीने मैदानात उतरते? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.


Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात