गॅब्रिएल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये ९% तुफान वाढ

मोहित सोमण:गॅब्रिएल इंडिया लिमिटेडचा शेअर आज मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर ८% पेक्षा अधिक पातळीवर उसळला आहे. सेबीने कंपनीच्या कॉर्पोरेट संरचनेला (Corporate Restructuring) मान्यता दिल्याने कंपनीच्या शेअरला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी १.३२ वाजेपर्यंत ८.९४% उसळला असून प्रति शेअर किंमत १०७० रूपयांवर पोहोचली आहे. ३० जूनला कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या स्कीम ऑफ अरेजमेंट अंतर्गत हा संरचना प्रस्ताव मंजूर झाला होता. त्याला एनएसई एक्सचेंजकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र (Non Objection Certificate) मिळाल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे.


प्रस्तावित एकत्रित योजना आणि एकत्रीकरण ही सेबीच्या नियम ११ (Composite Scheme of Amalgamation and Arrangement - Listing Obligations and Disclosure Requirements) २०१५ नियमाच्या तरतुदींचे पालन करेल असे कंपनीने आपल्या एक्सचेंज निवेदनात स्पष्ट केले आहे.


नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बीएसई (BSE) एशिया इन्व्हेस्टमेंट्समध्ये विलीनीकरणा साठी आणि एशिया इन्व्हेस्टमेंट्सच्या ऑटोमोटिव्ह उपक्रमाचे गॅब्रिएल इंडियामध्ये विलीनीकरण करण्यासाठी कंपनीला 'ना हरकत' पत्र जारी केल्यानंतर कंपनीच्या शेअर खरेदीचा उत्साह अधिकच वाढला आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १५२६७.९१ कोटी रुपये आहे. गेल्या ५२ आठवड्यात कंपनीच्या शेअर १३८६.४५ रूपये प्रति शेअरवर उच्चांकी (All time High) वर पोहोचला असून ३८७.०५ रूपये प्रति शेअरवर शेअर यापूर्वी निचांकी पातळीवर (All time Low) पातळीवर पोहोचले आहेत.


कंपनीच्या नव्या निर्णयानुसार, अँकेमको इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एशिया इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलीनीकरण होणार असून ऑटोमोटिव्ह व्यवसाय असलेल्या एशिया इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमधून हा व्यवसाय वेगळा करत तो गॅब्रिएल इंडिया लिमिटेडकडे हस्तांतरित केला जाणार आहे. काल मात्र ऑटो कंपोनेंट आणि इक्विपमेंट क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनी असलेल्या गॅब्रिएल इंडियाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. दिवसभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ७.३९% घट झाली होती. काल इंट्राडे लो दिवसात१,०७७.७ रुपयांचा निचांकी पातळीवर घसरला होता गाठला आहे, गेल्या पाच दिवसांत गॅब्रिएल इंडिया शेअर तोट्यात होता ज्यामुळे या कालावधीत एकूण १४.१३% ची घसरण झाली आहे. मात्र आज शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

अक्झो नोबेलचा शेअर धडाड! इंट्राडे १५% कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (Akzo Nobel India Limited) कंपनीचे शेअर आज जोरदार कोसळले आहेत. एका प्रसारमाध्यमांनी

गांधी घराण्याचे निष्ठावंत दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार! निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा काँग्रेसला दणका

हिंगोली: गांधी घराण्याचे निष्ठावंत दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार

Nephrocare IPO Listing Update: नेफ्रोकेअर हेल्थ सर्विसेस आयपीओचे अनपेक्षित दमदार लिस्टिंग ८.७० प्रिमियम प्रति शेअरसह बाजारात सूचीबद्ध

मोहित सोमण: नेफ्रोकेअर हेल्थ सर्विसेस (Nephrocare Health Services Limited) कंपनी आज शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाली आहे. ८७१.३९ कोटी बूक

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

FSSAI संस्थेचे राज्यांना अन्न भेसळीविरोधी युद्धपातळीवर निर्देश,धाडसत्र सुरु होणार!

मुंबई: मोठ्या प्रमाणात अन्नातील घातक पदार्थाची भेसळ सुरू असताना सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या अन्न

सकाळच्या सत्रात शेअर बाजारचे 'झकास' कमबॅक! सेन्सेक्स व निफ्टीत वाढ तर झाली पुढील स्ट्रॅटेजी काय? वाचा...

मोहित सोमण:सकाळच्या सत्रात शेअर बाजाराने 'कमबॅक' केले आहे विशेष महत्वाची वाढ म्हणजे युएसमधील पेरोल डेटातील