कानिफनाथ यात्रेत वादाची ठिणगी; मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने करणार बंद

अहिल्यानगर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणेजच श्री क्षेत्र मढीची कानिफनाथ यात्रा. याच यात्रेवरून आता हिंदू- मुस्लिम ही वादाची ठिणगी पेटली आहे. देवाची यात्रा म्हटल्यावर बरीच दुकाने या यात्रेत लावली जातात. लहानमुलांच्या खेळण्यापासून ते कपड्यांपर्यंतची दुकाने या यात्रेत लावलेली असतात. परंतु मढी ग्रामपंचायत मुस्लिमांना दुकाने लावू देणार नाही. या आपल्या जुन्या भूमिकेवर ग्रामपंचायत ठाम राहिली आहे. यात्रेपूर्वीच ही भूमिका जाहीर केल्याने यात्रेपूर्वीच हा वाद रंगला आहे.



नेमकं घडलं काय ?


दरवर्षीच रंगपंचमीच्या मुहूर्तावर मढी येथे मोठी कानिफनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते. मात्र गेल्या काही वर्षापासून या वादाला हिंदू मुस्लिम या भेदभावाची कीड लागली आहे.त्याचवेळी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यासायिकांसोबत यात्रेत व्यवसाय करण्यास मनाई करणारा निर्णय मंजूर केला होता. यात्रेत मुसलमांना दुकान लावू देणारच नाही असा निर्धार हिंदू गावकऱ्यांनी केला आहे. या निर्णयामुळे इतका मोठा गदारोळ झाला की वाद थेट न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने अद्याप यावर कोणताही अंतिम निकाल दिलेला नसला तरी गावकरी आपल्या मतावर ठाम असल्याची माहिती आहे.



सरपंचाची आक्रमक भूमिका


सरपंचानी स्पष्ट केले आहे की, ग्रामपंचायत आपल्या निर्णयावर ठाम असून यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली जाणार नाही.


कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाला अनेक भाविक हे राज्यभरातून येत असतात. भली मोठी यात्रा आणि त्यात होणारा हा हिंदू मुस्लिम वाद यामुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सतर्क झाले आहे

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व