सम्राट चौधरींना 'मोठा माणूस' म्हणून संबोधून भाजपने खेळली नवी खेळी

बिहार : बिहार निवडणुकीत सम्राट चौधरी यांच्यावर लावण्यात आलेल्या असंख्य आरोपांनंतरही भाजपने त्यांच्यावर विश्वास वर्तवला आहे. भाजपने बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना ‘मोठा माणूस’ (big man) म्हणून पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ बिहारच्या राजकारणासाठीच नव्हे, तर उत्तर प्रदेशातील ओबीसी व जातीय राजकारणातील धोरणात्मक हेतूंसाठी देखील महत्वाचा ठरू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.


सम्राट चौधरी हे केवळ उपमुख्यमंत्री नाहीत तर, ते बिहार विधानसभेतील भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देखील आहेत. सम्राट यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करून, भाजपने असा संदेश दिला आहे की, ते बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तयार करत आहेत. तारापूर मतदारसंघातील विजय आणि विधानसभेतील त्यांच्या संघटन नेतृत्वामुळे त्यांना अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांच्यावर अवलंबून नाही असा इशाराच जणू भाजपनं दिलेला आहे.


बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेवेळी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघातील सभेत जनतेला संबोधित करताना आवाहन केले होते की, "बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना मतदान करा आणि त्यांना विजयी करा. जर सम्राट चौधरी जिंकले तर, मोदी त्यांना खूप मोठा व्यक्ती बनवतील ." शहा यांच्या विधानानंतर, सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात असा विश्वास वर्तवला जात होता.



काय आहे उत्तर प्रदेश कनेक्शन?


ओबीसी मतदारांचा फोकस आहे की, भाजपा सम्राट चौधरी यांना एक स्टार प्रचारक (star campaigner) म्हणून ओबीसी सभांमध्ये आणू शकते, विशेषतः उत्तर प्रदेशात, जिथे OBC मतदार महत्त्वाचे आहेत.


भौगोलिक धोरण : उत्तर प्रदेशाच्या काही जिल्ह्यात (जसे की देवरिया, गाजीपुर) या अशा जागा आहेत जिथे कुशवाहा आणि अन्य OBC समाजांचे प्रमाण जास्त आहे.


राजकीय लाभ : भाजपा चौधरी यांचा वापर करून उत्तर प्रदेशातील पिछडलेल्या जमातींमध्ये एकता निर्माण करू शकते आणि आपल्या मतदारसंघाचा विस्तार वाढवू शकेल.



बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचा प्रमुख ओबीसी चेहरा सम्राट चौधरी यांचा हल्लीच तारापूरमधील विजय केवळ बिहारमध्ये एनडीएची पकड मजबूत करत नाही तर, २०२७ च्या उत्तर प्रदेश (यूपी) विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्व देखील देतो. कुशवाह (कोएरी) समुदायाचे असलेले सम्राट चौधरी भाजपसाठी ओबीसी एकीकरणाचे प्रतीक बनले असून उत्तर प्रदेशमध्ये, जिथे ओबीसी मतदार (४०%) निवडणूक समीकरण ठरवतात, सम्राटचा प्रभाव बिहारमधून सीमावर्ती भागात पसरू शकतो असा अंदाज दिल्लीतील भाजप नेतृत्वाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे.

Gold Silver Rate Today: अखेर ४ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्यात व सलग दुसऱ्यांदा चांदीत वाढ का होत आहे ? 'हे' आहेत आजचे दर

मोहित सोमण: गेले ४ दिवस घसरणीला ब्रेक लागला असून आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने आज

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार; शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढणार?

सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही शिवसेना-भाजपने आम्हाला डावलले - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल

क्विक हीलने टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ लाँच सायबर क्राईमपासून आता संपूर्ण मुक्ती मिळणार

मुंबई: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल