पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.


नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (५०० एमएलडी), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारितील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एसएनडीटी एचएलआर टाकी व एमएलआर टाकी परिसर, चतु:शृंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र तसेच नव्याने समाविष्ट गावे बूस्टर पंपिगअंतर्गत येणारा परिसर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत तीन हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. खडकवासला धरणातून एक हजार ४०० मिलिमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या तीन हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला जोडण्यात आल्या आहेत. आता खडकवासला ते पर्वती तीन हजार मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीवरील फ्लोमीटर बसविणे व एक हजार ४०० मिलिमीटर वाहिनीवरील बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविणे या कामांसाठी एक हजार ४०० मिलिमीटर व्यासाचे व्हॉल्व्ह पूर्ण बंद होत आहेत. त्याच्या तपासणीसाठी व वडगाव जलशु‌द्धीकरण केंद्र ‘फेज २’ची क्षमता वाढविण्यासाठी नवीन संपवेल टाकीच्या भिंतीला कोअर कटिंग करण्यासाठी; तसेच देखभाल-दुरुस्तीच्या इतर कामांसाठी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा गुरुवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेने पाणीपुरवठा बंद असणाऱ्या प्रभागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे व पाण्याचा साठा करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल–२  आणि सी.एल–३  परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक