प्रतिनिधी: आज जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) व मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर गुंतवणूकदारांना खरेदीसाठी सूचवले आहेत जाणून घेऊयात नक्की कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर -
१) अदानी ग्रीन एनर्जी- कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल सिक्युरिटीज ब्रोकिंगने बाय कॉल दिला असून या शेअरची लक्ष्य किंमत (Target Price TP) १२८९ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
२) हानिवेल ऑटोमेशन इंडिया- कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून हा शेअर खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यासाठी लक्ष्य किंमत ३९७८० रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
३) मॅक्स हेल्थकेअर- कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ११८१ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
४) अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट- कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून कंपनीकडून १२३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
मोतीलाल ओसवालकडून पुढील शेअर खरेदीचा सल्ला -
१) मॅक्स हेल्थकेअर- कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला आहे. ११२२ रूपये प्रति शेअर सामान्य खरेदी किंमतीसह (Common Market Price CMP) १३६० रूपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
२) ग्लेनमार्क फार्मा- कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला आहे. १८६९ रूपये प्रति शेअर सामान्य किंमतीसह २१७० रुपये लक्ष्य किंमत शेअरसाठी निश्चित करण्यात आली आहे.
३) पेट्रोनेट एलएनजी- कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने बाय कॉल दिला असून २७६ रूपये प्रति शेअर सामान्य किंमतीसह शेअरला ४१० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.