विशेष Explainer: पाच दिवसांत ५.४५%, महिनाभरात २१.३६%, व सहा महिन्यांत ६१.४६% रिटर्न्स देणारा वोडाफोन आयडिया शेअर का वाढत आहे?

मोहित सोमण: गेल्या वर्षभरापासून एजीआर (Adjusted Gross Revenue AGR) विवादात फसलेल्या वोडाफोन आयडिया लिमिटेड (Vodafone Idea VI Limited) शेअरने आपले जबराट पुनरागमन बाजारात केले आहे. काल वीआयने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीचा शेअर १ वर्षाच्या अप्पर सर्किटवर म्हणजेच ११.०८ रूपयांवर पोहोचला होता. आज मात्र १% पातळीवर बाजारात घसरण झाली आहे. दुपारी १.१५ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.८२% घसरण होत शेअर १०.८४ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. मात्र गेल्या आठवड्यात शेअरने चांगला परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. गेल्या तीन दिवसात कंपनीचा शेअर ११% पेक्षा अधिक पातळीवर उसळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वीआयला सरकारकडून २०१६-२०१७ पासून प्रलंबित असलेला एजीआरवर तोडगा (Reconcile) काढण्याचे आदेश दिले होते. यामध्ये कंपनीला मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याखेरीज काल तिमाही निकालाप्रमाणे कंपनीच्या निव्वळ तोट्यातही घसरण झाल्याने कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. या दोन कारणांमुळे गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.


आज नका बुकिंग व बाजारातील अस्थिरतेमुळे किरकोळ घसरण झाली असली तरी कंपनीच्या शेअरने गेल्या पाच दिवसांत ५.४५%, महिनाभरात २१.३६%, व सहा महिन्यांत ६१.४६% परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. कंपनीचा सबस्क्राईबर बेस ठीक असला तरी कंपनीवर गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कर्जाचे ओझे होते. दुरसंचार विभागाने (Department of Telecommunications) कडून प्रलंबित एजीआर कंपनीकडे २०१६-२०१७ कालावधीतील मागितला होता. वीआयएलने दूरसंचार विभागाच्या ५६०६ कोटींच्या मागणीविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात नवीन याचिका दाखल केली होती. सध्या कंपनीचे ७८५०० कोटींची एजीआर थकबाकी आहे.


२७ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारला आर्थिक वर्ष २०१७ पर्यंत व्याज आणि दंडासह सर्व देणींचे व्यापक पुनर्मूल्यांकन आणि समेट करण्याची परवानगी मिळाली होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ऑपरेटरसाठी हा एक मोठा दिलासा मिळाला होता. असे असताना कंपनीचा आर्थिक निकालातही सुधारणा झाली होती. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ तोट्यात सुधारणा झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७१७५.९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ५५२४.२ कोटींचा निव्वळ तोटा (Net Loss) कंपनीला झाला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये गेल्या वर्षीच्या १०९३२.२ कोटींच्या तुलनेत २.४% वाढ झाल्याने महसूल १११९४.७ कोटीवर पोहोचला होता. कंपनीच्या एआरपीयुतही (Average Revenue per User ARPU) मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १६५ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १८० कोटींवर एआरपीयु पोहोचला आहे.


या तिमाहीत महसूल १११.९ अब्ज रुपये होता जो इयर ऑन इयर बेसिसवर २.४% होता. अहवालानुसार, तिमाहीसाठी ईबीटा ४६.९ अब्ज रुपये होता. IndAS ११६ चा परिणाम वगळता रोख ईबीटा (EBITDA) अथवा करपूर्व नफा) २२.५ अब्ज रुपये होता. आर्थिक वर्ष २५ च्या दुसऱ्या तिमाहीत महसूल २३.२ अब्ज रुपये होता. तिमाहीसाठी आणि आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीसाठी कॅपेक्स अनुक्रमे १७.५ अब्ज रुपये आणि ४२.० अब्ज रुपये होता असे कंपनीने म्हटले आहे.


उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने ३० सप्टेंबर २०२५ रोजी बँकांकडून कर्ज १५.३ अब्ज रुपये होते आणि रोख आणि बँक शिल्लक ३०.८ अब्ज रुपये होती. या वर्षी मार्चमध्ये Vi 5G सेवा आणि सहा महिन्यांच्या कालावधीत ५G स्पेक्ट्रम असलेल्या सर्व १७ प्राधान्य मंडळांमध्ये विस्तारित केले गेले आहे. त्यामुळे हे विभाग कंपनीच्या महसुलात सुमारे ९९% इतकी मोलाची भूमिका बजावतात. सध्या व्हीआय ५जी सेवा २९ शहरांमध्ये उपलब्ध आहेत आणि ग्राहकांच्या मागणी आणि ५जी हँडसेटच्या वापरावर आधारित आम्ही अधिक शहरांमध्ये विस्तार करत राहू.


'५जी रोलआउटसोबतच, आम्ही नवीन ४जी साइट्स जोडून आणि हाय स्पीड ब्रॉडबँड नेटवर्कसाठी आमचे कोर आणि ट्रान्समिशन नेटवर्क अपग्रेड करून आमच्या हाय-स्पीड ब्रॉडबँड नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत. मार्च २०२४ मध्ये आमचे ४जी लोकसंख्येचे कव्हरेज ८४% पेक्षा जास्त झाले आहे जे मार्च २०२४ मध्ये ७७% होते. आमची ४जी डेटा क्षमता ३८% पेक्षा जास्त वाढली आहे, ज्यामुळे मार्च २०२४ च्या तुलनेत सप्टेंबर २०२५ मध्ये ४जी स्पीडमध्ये १७% सुधारणा झाली आहे. आमच्या नियोजित गुंतवणुकीसह, ४जी लोकसंख्येचे कव्हरेज लोकसंख्येच्या सुमारे ९०% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.' असे कंपनीने म्हटले होते.


व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे सीईओ अभिजित किशोर म्हणाले आहेत की,' ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्याच्या आमच्या धोरणात्मक हेतूकडे आम्ही सातत्याने प्रगती करत आहोत. आम्ही आमचे ४जी कव्हरेज ८४% पेक्षा जास्त लोकसंख्येपर्यंत वाढवले आणि आमच्याकडे ५जी स्पेक्ट्रम असलेल्या सर्व १७ मंडळांमध्ये ५जी रोलआउट पूर्ण केले.डेटा व्हॉल्यूममध्ये सुमारे २१% वाढ आमच्या भिन्न प्रीपेड आणि पोस्टपेड ऑफरिंगद्वारे ग्राहकांना टिकवून ठेवण्याची आणि त्यांना जोडण्याची आमची क्षमता दर्शवते. आम्ही आमचे ४जी कव्हरेज ९०% लोकसंख्येपर्यंत वाढवण्यावर आणि वाढत्या ५जी हँडसेट दत्तक घेऊन भौगोलिक क्षेत्रात आमचा ५जी फूटप्रिंट वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमच्या ५००-५५० अब्ज रुपयांच्या व्यापक भांडवली खर्चाच्या योजनांना पाठिंबा देण्यासाठी कर्ज वित्तपुरवठा सुरक्षित करण्यासाठी आम्ही कर्जदारांशी संपर्कात आहोत. आम्ही पुढे जात असताना, उत्कृष्ट ग्राहकांना अनुभव देण्यासाठी आमचा गुंतवणूक प्रवास सुरूच आहे.' असे म्हटले होते.


सप्टेंबरमध्ये, वोडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाने उभारलेल्या ९४५० कोटी रुपयांच्या एजीआर मागणीवर दंड आणि व्याज माफ करण्याची मागणी केली होती त्यातील बराचसा २०१७ सालच्या आधीच्या कालावधीशी संबंधित आहे जो २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आधीच निकाली काढला होता. या रकमेपैकी २७७४ कोटी रुपये व्होडाफोन आयडियाच्या विलीनीकरणानंतर थकबाकीशी संबंधित आहेत तर ५६७५ कोटी रुपये व्होडाफोन समूहाच्या विलीनीकरणापूर्वीच्या देणींशी संबंधित आहे असा युक्तिवाद कंपनीने केला होता. मात्र एप्रिलमध्ये थकित थकबाकीतील आधारावर भारत सरकारने २२% भागभांडवल कंपनीचे खरेदी केले होते. त्यानंतर आणखी भागभांडवल खरेदी सरकारने केले. आता एकूण ४९% भागभांडवल (Stake) सरकारचा आहे. पण सरकारने आम्ही अधिग्रहण करणार नसल्याच यावेळी स्पष्ट केले होते.


मात्र व्होडाफोन आयडियाने ३६९५० कोटींच्या थकीत देणी इक्विटीमध्ये रूपांतरित केली गेली जी सरकारकडे ट्रान्स्फर झाली होती. मूळ प्रवर्तक, व्होडाफोन पीएलसी आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांचे कंपनीवरील ऑपरेशनल नियंत्रण कायम राहणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. वोडाफोन यूकेचे भागभांडवल सुमारे २४.४% वरून अंदाजे १६.१% कमी झाले आहे आणि आदित्य बिर्ला यांची मालकी १४% ९.४% कमी झाले आहे


मात्र कंपनीच्या उत्पन्नात सुधारणा होत असताना तोट्यातही घसरण होत आहे. प्रति ग्राहक महसूलातही वाढ होत असताना सरकारच्या नव्या दिलासा दिल्यानंतर कंपनीच्या मजबूत फंडामेंटलमुळे यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

Comments
Add Comment

थोड्याच वेळापूर्वी सुदीप फार्मा आयपीओसाठी प्राईज बँड घोषित 'ही' असेल प्रति शेअर किंमत

मोहित सोमण: सुदीप फार्मा लिमिटेड कंपनीने आपली प्राईज बँड (Price Band) आज जाहीर केला आहे. ५६३ ते ५९३ रूपये प्रति शेअर हा

सिडबी वेंचर कॅपिटल अंतरिक्ष वेंचर कॅपिटल फंडात १००० कोटी गुंतवणूक करणार

मोहित सोमण: स्पेस टेक टेक्नॉलॉजीत सातत्याने भारतात प्रगती होत आहे. मोठ्या प्रमाणात अंतराळ संशोधन अथवा

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पासाठी 'ॲक्शन' मोडवर

प्रतिनिधी:अखेर फेब्रुवारी महिन्यात महत्वपूर्ण आर्थिक वर्ष २०२६-२७ अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यासाठी

Top Stocks Picks for Today: आजचे 'हे' ७ शेअर खरेदी केल्यास भविष्यात ठरणार फायदेशीर जाणून घ्या यादी थोडक्यात!

प्रतिनिधी: आज जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) व मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने

कामगार प्रतिनिधित्वात ५५.४% वाढ, महिला कामगारांच्या प्रतिनिधित्वातही मोठी वाढ

बेरोजगारीत कुठलाही बदल नाही - सरकारी सर्वेक्षण मोहित सोमण: नुकत्याच नव्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,