एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय


नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने त्यांची लोकप्रिय एमकॅश सेवा ३० नोव्हेंबर २०२५नंतर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ऑनलाइन एसबीआय आणि लाइट अॅपद्वारे पैशांची देवाणघेवाण आणि क्लेम करण्याची सुविधा संपेल. जे खातेदार फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेलद्वारे त्वरित पैसे पाठवत होते, त्यांना आता नवीन पर्याय शोधावे लागतील. बँकेने वेबसाइटवर नोटीस जारी करून ग्राहकांना सुरक्षित डिजिटल मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.


 ३० नोव्हेंबर २०२५ नंतर एमकॅश सेवा पूर्णपणे बंद होईल. ऑनलाइनएसबीआय आणि योनो लाइट अॅपद्वारे पैसे पाठवणे व क्लेम करणे शक्य राहणार नाही.  एमकॅश बंद झाल्यावर यूपीआय (भीम एसबीआय पे), आयएमपीएस (२४ तास त्वरित), एनईएफटी (दिवसभर बॅच) आणि आरटीजीएस (मोठ्या रकमेसाठी) हे सुरक्षित पर्याय वापरा. ही सेवा जुनी तंत्रज्ञानावर आधारित होती आणि यूपीआयसारख्या आधुनिक पद्धतींमुळे ती अप्रासंगिक झाली. त्यामुळे एसबीआय डिजिटल रूपांतरासाठी बंद करत आहे.


एमकॅशमध्ये काय खास?


एमकॅश ही एसबीआयची खास योजना होती, ज्यात लाभार्थ्याची माहिती जोडण्याची गरज नव्हती. फक्त मोबाइल किंवा ईमेल आयडी टाकून पैसे पाठवता येत होते. पैसे घेणाऱ्याला एसएमएस किंवा ईमेलद्वारे सुरक्षित लिंक आणि ८ अंकी पासकोड मिळत असे, ज्याने तो कोणत्याही बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करू शकायचा. लाइट किंवा एमकॅश अॅप (गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड) वापरून एमपीआयएन सेट करून लॉगिन करून क्लेम करता येत होते. भविष्यासाठी आवडीनुसार खाते सेव्हही करता येत. ही सेवा छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी
लोकप्रिय होती.


बंद होण्याचे कारण काय?


एमकॅश ही सेवा जुन्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा असल्याने ती कालबाह्य झाली आहे. यूपीआयसारख्या आधुनिक पद्धतींनी त्याचे महत्त्व कमी झाले. आता बहुतेक लोक सेकंदात व्यवहार करतात, त्यामुळे एमकॅशचा वापर खूपच कमी झाला. एसबीआय डिजिटल रूपांतराच्या मोठ्या योजनेत गुंतले असून, सुरक्षित आणि वेगवान पर्यायांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.


ग्राहकांसाठी सल्ला


१ डिसेंबरपासून एमकॅश बंद होत असल्याने ग्राहकांना त्वरित नवीन पद्धती शिकाव्या लागणार आहेत. बँकेच्या अॅप किंवा वेबसाइटवरून तुम्हालायाचा सराव करावा लागणार आहे. यूपीआयद्वारे व्यवहार सुरक्षित राहतील आणि वेळ वाचणार आहे. दरम्यान थर्ड पार्टीला पैसे पाठवण्यासाठी हा नवा पर्याय तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे डिजिटल बँकिंग अधिक मजबूत होईल, असे एसबीआयने म्हटलंय.


पर्यायी व्यवहार पद्धत
एमकॅश बंद झाल्यानंतर यूपीआय हा मुख्य पर्याय आहे. एसबीआयचे भीम एसबीआय पे अॅप सर्व बँक ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. शॉपिंग, बिल भरणे, रिचार्ज, टॅक्सी बुकिंग यासाठी हे सोयीचे आहे. यासोबतच आयएमपीएस (२४ तास त्वरित ट्रान्स्फर), एनईएफटी आणि आरटीजीएस हे सर्व सुरक्षित आणि सोपे पर्याय आहेत.

Comments
Add Comment

Delhi Special Cell कडून कुर्ल्यातील १८ वर्षीय तरुणाला अटक; पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

- टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Cbse Starts Digital Answer Sheet : उत्तरपत्रिका तपासणीत AI ची दणक्यात एंट्री! आता तुमची उत्तरं 'मशीन' वाचणार; CBSE चा नवा बदल वाचा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) यंदाच्या १२वीच्या परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत एक

Middle East War : मध्यपूर्व युद्ध पुन्हा पेटलं! इराणचा भारताला संपर्क, उच्चस्तरीय चर्चा सुरु

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे

Iran Israel War, Tehran : तेहरानजवळील निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला, १३ जणांचा मृत्यू

तेहरान : सोमवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इस्लामशहरजवळ एका निवासी इमारतीवर

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन