प्रतिनिधी:अखेर फेब्रुवारी महिन्यात महत्वपूर्ण आर्थिक वर्ष २०२६-२७ अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थतज्ज्ञ व भांडवल बाजारतज्ज्ञ, इंडस्ट्री व कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अंतिम अर्थसंकल्प निर्माण करण्यापूर्वी वित्त मंत्रालय संबंधित जाणकारांचे मत जाणून घेत असते. यावेळी या बैठक, व चर्चासत्राला सुरूवात झाली असू विषयीची माहिती आपल्या एक्स पोस्टमध्ये वित्त मंत्रालयाने दिली आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की,' केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ वर्षाच्या संदर्भात भांडवली बाजारातील भागधारकांसोबत चौथ्या पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलतीचे अध्यक्षस्थान भूषवले आहे.' असे म्हटले. केंद्रीय वित्तीय राज्यमंत्री पंकज चौधरी, भारताचे आर्थिक सल्लागार नागेश्वरन व इतर तज्ज्ञ देखील या बैठकीत उपस्थित होते.
या बैठकीत गरजा, मागणी, अपेक्षा, आर्थिक नियोजन अशा विविध विषयांवर चर्चा झाली होती. यांनी वित्त मंत्रालयाला या निमित्ताने आपली सल्लामसलत केली आहे. उपलब्ध माहितीनुसार यंदा बँकिंग,बीएफएसआय (Banking Financial Services and Insurance), आयटी या क्षेत्रात विशेष महत्व दिले जाणार आहे. तसेच उत्पादन, मूलभूत सुविधा, स्टार्टअप या क्षेत्रातील सुधारणांनाही महत्व दिले जाईल अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. २० नोव्हेंबरला हॉस्पिटालिटी, पर्यटन क्षेत्रातील मान्यवर वित्तमंत्र्यांना भेटणार असून २१ तारखेला पायाभूत सुविधा (Infrastructure),ऊर्जा, नागरी विकास इत्यादी विषयांवर संबंधित क्षेत्रातील नेते मान्यवर भेटणार आहेत. अंतिम बैठक २६ तारखेला होणार असून यावेळी विभागाचे अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील प्रणेते वित्तमंत्र्यांना भेटणार आहेत. यापूर्वी त्यांनी एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांची भेट घेतली होती.