अखेर अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या, भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग!

नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी माहिती सूत्रांमार्फत दिली जात आहे. अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी हत्याकांड, सिद्धू मूसेवाला हत्याकांड आणि सलमान खानच्या घरावर गोळीबाराचा मास्टरमाइंड आहे.अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे आणि त्याने लॉरेन्स टोळीच्या प्रत्येक कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले असून केंद्रीय संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेसाठी हे एक मोठे यश मानले जात आहे. अनमोल बिश्नोईवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येआधी शूटर अनमोलच्या संपर्कात होते. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला शूटर घटनेपूर्वी अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता, असे यापूर्वी मुंबई गुन्हे शाखेने सांगितले होते. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनमोल आणि तीन संशयित शूटर यांच्यात कॅनडा आणि अमेरिकेत असताना स्नॅपचॅटद्वारे संदेशांची देवाणघेवाण झाली.


कोण आहे अनमोल बिश्नोई?




  1. अनमोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्सचा धाकटा भाऊ आहे.

  2. अमेरिकेत बसून तो भारतात गुन्हेगारी कारवाया करत होता.

  3. अनमोलविरुद्ध १८ गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये मूसेवालाच्या हत्येसाठी शस्त्रे आणि रसद पुरवणे यांचाही समावेश आहे.

  4. मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली होती.

  5. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकीची त्यांच्या मुलाच्या ऑफिसबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, अनमोलही त्या गोळीबार करणाऱ्यांच्या
    संपर्कात होता.


एनआयएने अनमोलला 'मोस्ट वॉन्टेड' व्यक्ती म्हणून घोषित केले आहे आणि त्याच्या डोक्यावर '१० लाख' रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केले आहे.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

एनडीए बिहारमध्ये पास, दिल्ली आणि महाराष्ट्रात 'स्थानिक'च्या परीक्षेसाठी सज्ज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा