केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या मैदानावर प्रथमच कसोटी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोलकात्यातील निराशाजनक पराभवानंतर मालिकेत पुनरागमन करण्याचा दबाव भारतीय संघावर आहे, तर पहिल्या विजयामुळे आफ्रिकन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.


दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याच्या सलग तीन विकेट्सवरून उद्भवलेल्या “नॉन-हॅटट्रिक” चर्चेला जोर आला आहे. कोलकाता कसोटीत महाराजने भारताचे शेवटचे दोन फलंदाज अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना दोन सलग चेंडूंवर बाद केले. त्यामुळे गुवाहाटीत तो गोलंदाजीसाठी येताच पहिल्याच चेंडूवर जर त्यांनी विकेट घेतली, तर त्याच्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स पूर्ण होतील. मात्र, हे तांत्रिकदृष्ट्या हॅटट्रिक मानले जाणार नाही, कारण नियमांनुसार एखाद्या गोलंदाजाने एकाच सामन्यात सलग तीन चेंडूंवर विकेट घेतल्यावरच हॅटट्रिक मानली जाते. पुढील सामन्यात मिळालेली तिसरी विकेट त्या नियमात बसत नाही. यापूर्वी २०२१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध महाराजने टेस्ट हॅटट्रिक नोंदवली आहे.


बारसापारा स्टेडियम कसोटी क्रिकेटसाठी नवे असल्याने येथील खेळपट्टीचा प्रभाव कसा असेल याबाबत मोठी उत्सुकता आहे. विकेट फलंदाजांसाठी अनुकूल राहील की स्पिन आणि सीम दोन्ही गोलंदाजांना मदत मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिल्याच तासात पिच सामन्याची दिशा ठरवू शकेल. मालिकेत १–० ने मागे असलेल्या भारतासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, तर दक्षिण आफ्रिका आघाडी कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. कसोटी क्रिकेटच्या गुवाहाटीतील पहिल्या अध्यायाचा निकाल काय येणार, याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!

‘कटक’मध्ये पहिला सामना; ‘अहमदाबाद’मध्ये अंतिम लढत मुंबई : के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर