ये पब्लिक है, सब जानती है!

केडीएमसीच्या महापौरपदावर खा. श्रीकांत शिंदे यांचे उत्तर


कल्याण  : ''ये पब्लिक है, सब जानती है. कुणीही काहीही बोलो, जनता जनार्दनच ठरवणार की महापौर कुणाचा बसणार'',असे उत्तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी पालिकेवर भाजपचा महापौर बसविण्यासाठी जीवाचे रान केले आहे. त्यावर खा.शिंदे यांनी हा टोला हाणला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. कल्याण पूर्व येथे आयोजित विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव २०२५ कार्यक्रमात खा. श्रीकांत शिंदे यांचा आज सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र आणि भव्य पुतळा उभारून कल्याणकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केल्याबद्दल आयोजक मंडळातर्फे त्यांचा मानपत्र, शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


या भीम महोत्सवाला नागरिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. गायक साजन बेंद्रे आणि गायिका कडूबाई खरात यांच्या गाण्याचा कार्यक्रमदेखील होता. यावेळी आमदार राजेश मोरे, अण्णा रोकडे, देवचंद आंबादे, समितीचे अध्यक्ष सुमेध हुमणे, अतिश गायकवाड, राजू रोकडे, शिवसेनेचे महेश गायकवाड, निलेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. शिंदे यांनी सामाजिक प्रबोधन, शिक्षणवाढ, तसेच डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा शहरात अधिक प्रभावी प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढील काळातही विकासकामे सुरू राहतील, असे आश्वासन दिले. कल्याण पूर्वेत लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा असे वाटत होते. त्या ठिकाणी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहिले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण येता कामा नये, असे खा. शिंदे यांनी सांगितले. आपण कोणालाही उद्देशून बोललेलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर