विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री मंगल नारायण नांगरे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सालीतील शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.


देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये मंगल नांगरे पाटील यांच्या शांत स्वभावाचे, त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांचे आणि त्यांच्या निस्वार्थ मायाळूपणाचे स्मरण केले. त्यांनी लिहिले की, आज मन जड झाले आहे; विश्वास नांगरे पाटील आणि विकास नांगरे पाटील यांच्या मातोश्रींच्या निधनाने एक भावनिक पोकळी निर्माण झाली आहे.


सत्यजित देशमुख यांनी पुढे नमूद केले की, सकाळपासून मन अस्वस्थ होतं. कोकरूडमध्ये जाऊन काकींना भेटण्याचा योग आला, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यांना भेटताना मला माझ्या आईची आठवण झाली. शिराळ्याला पोहोचताच त्यांच्या निधनाची बातमी कळली आणि मन सुन्न झाले. काकींचा शांत स्वभाव, त्यांची माया आणि संस्कारांची शिदोरी हे सर्व आयुष्यभर स्मरणात राहील.


देशमुख यांनी ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या कठीण प्रसंगातून संपूर्ण कुटुंबाला धीर, आधार आणि सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना व्यक्त केली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च