मोहित सोमण: काही कंपन्यानी लाभांश देण्यासाठी आपली एक्स डेट संचालक मंडळाच्या बैठकीनंतर घोषित केली होती. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आज १० शेअरची एक्स डेट (Ex Date) असणार आहे. म्हणजेच कालपर्यंत संबंधित शेअरची खरेदी करणाऱ्या शेअरहोल्डरला हा लाभांश (Dividend) मिळणार आहे एक्स-डेटला किंवा त्यानंतर शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार अथवा लाभार्थी घोषित केलेल्या फायद्यांसाठी पात्र नसतील. तसेच जाणून घेऊयात कॉर्पोरेट अँक्शनसह त्या कुठल्या कंपन्या आहेत लाभांश देतील त्या जाणून घेऊयात....
१) Adani Enterprises - आज १७ नोव्हेंबरला कंपनीच्या राईट इश्यूसाठी एक्स डेट (Ex Date) असणार आहे असे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे.
२) Bajaj Finserv - बजाज फिनसर्व्ह कंपनीने आपला राईट इश्यूसाठी आजची एक्स डेट निश्चित केली आहे.
३) Baid Finserv- बेद फिनसर्व्ह कंपनीने आपल्या राईट इश्यूसाठी आजची एक्स डेट निश्चित केली आहे.
४) Balram Chini Mills- बलराम चिनी मिल्स कंपनीने आपल्या अंतरिम लाभांश (Interim Dividend) ३.५० प्रति शेअर निश्चित केला होता त्यासाठी आज १७ नोव्हेंबरला एक्स डेट निश्चित केली आहे.
५) EPL- ईपीएल कंपनीच्या शेअरचा अंतरिम लाभांश (Interim Dividend) २.५० रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश (Interim Dividend) जाहीर केला आहे. यासाठी आज एक्स डेट निश्चित करण्यात आली आहे.
६) Arfin India: अरफिन इंडिया कंपनीने ०.११ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला होता. त्यासाठी आज एक्स डेट निश्चित करण्यात आली आहे.
७) GMM Pfaudler- जीएमएम पीफॉडलर कंपनीकडून गुंतवणूकदारांसाठी १ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आला होता त्यासाठी आज एक्स डेट असणार आहे.
८) Gopal Snacks- गोपाल स्नॅक्स कंपनीने गुंतवणूकदारांसाठी ०.२५ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश निश्चित करण्यात आला होता. त्यासाठी आज एक्स डेट असेल.
९) Pearl Global Industries- पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीने गुंतवणूकदारांसाठी ६ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. आज त्यासाठी एक्स डेट निश्चित करण्यात आली आहे.
१०) Surya Roshni- सूर्य रोशनी कंपनीने गुंतवणूकदारांसाठी २.५० रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला होता त्यासाठी आज एक्स डेट निश्चित करण्यात आली आहे.