देशात इंदिरा गांधींची लाट होती त्या काळात १९८५ मध्ये काँग्रेसने २०१८ आमदारांचा टप्पा गाठला होता. ही देशातल्या काँग्रेस आमदारांची सर्वोच्च संख्या होती. हा विक्रम एक दिवस भारतीय जनता पार्टी नक्की मोडीत काढेल, असाही विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.
भाजप आमदारांची संख्या कशी वाढली ?
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या संख्येत २०१४ पासून वाढ होत आहे. या संदर्भातली आकडेवारी भाजपच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. भाजप आमदारांची संख्या २०१४ मध्ये १,०३५ होती. नंतर २०१५ मध्ये ९९७, २०१६ मध्ये १,०५३ आणि २०१७ मध्ये १,३६५ अशी लक्षणीय वाढ झाली. त्यानंतर २०१८ मध्ये ही संख्या १,१८४, २०१९ मध्ये १,१६० आणि २०२० मध्ये १,२०७ झाली. यानंतर २०२१ मध्ये १,२७८ आमदार, २०२२ मध्ये १,२८९, २०२३ मध्ये १,४४१, २०२४ मध्ये १,५८८ आणि आता २०२५ मध्ये १,६५४ आमदारांसह वाढीचा कल कायम आहे