सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत या स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे, हा प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती गांधीनगर जयपूर रेल्वे विभागाकडून देण्यात आली. आधुनिक दर्जाच्या सुविधांसह रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी २१२.४८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानकांवरील दोन्ही इमारतींना जोडणारा ७२ मीटर रुंद आणि दोन हजार ७०० चौ.मी. क्षेत्रफळात हा एक मार्ग तयार करण्यात आला आहे. या एअर कॉनकेअर्समध्ये प्रवाशांसाठी संपूर्ण आधुनिक सुविधा असणार आहे.
‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत या स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे, ज्यामध्ये प्रवाशांसाठी लिफ्ट, एस्केलेटर, दिव्यांगजन-अनुकूल सुविधा, ग्रीन बिल्डिंग वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता तपासणी यांसारख्या सुविधांचा समावेश असेल. यामध्ये बॅगेज स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर यांसारख्या सुरक्षा उपकरणांचा समावेश असेल. स्थानकावर मॉड्यूलर शौचालये, प्रतीक्षा कक्ष आणि शॉपिंग मॉल, कॅफेटेरिया गेम झोन यांसारख्या सुविधा असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी३० लिफ्ट आणि १८ एस्केलेटर बसवण्याची योजना आहे. दिव्यांगांना सहज प्रवास करता यावा यासाठी विशेष सुविधा पुरवल्या जातील.हा विभाग प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असणार आहे. प्रकल्पाचे जानेवारीपर्यंत लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती जयपूर रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) वैशिष्ट्ये
स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्पात ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंग वैशिष्ट्ये समाविष्ट केली जातील, ज्यात कचरा व्यवस्थापन आणि पावसाच्या पाण्याची साठवणूक यांचा समावेश आहे. या पुनर्विकासात पर्यावरणास अनुकूल अशा टिकाऊपणावर लक्ष केंद्रित केले जाईल.