पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय


तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई तिच्या मुलाकडून पोटगी (पालनपोषण खर्च) मागू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय केरळ उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. तसेच ६० वर्षीय आईला दरमहा ५,००० रुपये पोटगी देण्याच्या कुटुंब न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने निकाली काढली. कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाविरोधात मुलाची उच्च न्यायालयात याचिका आईने कलम १२५ सीआरपीसी अंतर्गत आखाती देशात परदेशात काम करणाऱ्या मुलाकडे प्रति महिना २५,००० रुपये पालनपोषण खर्चाची मागणी केली होती. पुराव्यांचा विचार केल्यानंतर, कुटुंब न्यायालयाने प्रति महिना ५००० रुपये मंजूर केले. यानिर्णयाविरोधात मुलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुलाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याची आई गुरेढोरे पाळून पैसे कमवत होती. तिला पालनपोषण भरपाईची आवश्यकता नाही. माझे बोट मालक असणारे वडील मच्छीमारी करुन तिचा संभाळ करतात, असा युक्तीवाद मुलाने केला. उच्च न्यायालयाने मुलाने केलेल्या युक्तिवादावर ताशेरे ओढत निरीक्षण नोंदवले की, "एका श्रीमंत मुलाने आपल्या वृद्ध आईला गुरेढोरे पाळून उपजीविका करण्यास सांगणे दुर्दैवी आणि अयोग्य आहे.


गुरे पालन हे शारीरिकदृष्ट्या कठीण काम आहे. वृद्ध आईने असे काम करावे, अशी अपेक्षा करणे हे मुलाच्या नैतिक अपयशाचे आणि आईच्या कल्याणाचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन दर्शवते. ही परिस्थिती सामान्यतः वृद्ध पालकांबद्दल काळजी, आधार आणि आदराचा अभाव दर्शवते जे कदाचित तिच्या श्रीमंत मुलावर अवलंबून असतील किंवा त्यांच्या आधाराला पात्र असतील.” न्यायमूर्ती एडाप्पागथ यांनी स्पष्ट केले की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १२५ अंतर्गत आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) च्या कलम १४४ ने बदलले आहे. पत्नी, मुले किंवा स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या पालकांसाठी पोटगी मागण्याचा अधिकार आहे. आईला तिच्या मुलांकडून पालनपोषण खर्च मिळवण्याचा अधिकार हा तिच्या पतीच्या दायित्वापासून स्वतंत्र आहे. जरी पती जिवंत असला आणि तिला सांभाळण्यास सक्षम असला तरी, मुलाकडून तिला सांभाळण्याची कायदेशीर जबाबदारी काढून घेतली जात नाही.


आईचे स्वतंत्र उत्पन्न असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे मुलगा सादर करू शकला नाही. त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलाचे पालनपोषण करण्याबद्दलचा त्याचा युक्तिवाद देखील फेटाळण्यात आला. न्यायालयाने असे म्हटले की, “मुलगा केवळ विवाहित आहे. त्याचे कुटुंब आहे म्हणून त्याच्या वृद्ध पालकांचे पालनपोषण करण्याच्या दायित्वापासून सुटू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाला कौटुंबिक न्यायालयाच्या आदेश कायम ठेवत मुलाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.

Comments
Add Comment

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले