डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४० टक्के भारतीयांनी कधी ना कधी सहकर्मचाऱ्यांसोबत रिलेशन ठेवले आहे. बदलती मानसिकता आणि ओपन रिलेशनशिपची वाढ स्पष्ट दिसते. कामाच्या ठिकाणी प्रेमसंबंध ही नवी गोष्ट नाही, पण भारतात हे संबंध मोठ्या संख्येने दिसत असल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय रिसर्चमधून समोर आला आहे. एशली मॅडिसन या सिक्रेट नातेसंबंधांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्लॅटफॉर्ममधील युगोव्हच्या सहकार्याने जगातील ११ देशांमध्ये हा रिसर्च केला. यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.


रिसर्चमधल्या यादीत मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि यूएस या ११ देशांमधील एकूण १३,५८१ प्रौढ व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार भारतीयांमध्ये ऑफिसमध्ये रिलेशनशिप मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र अनेक कंपन्या व्यावसायिक मर्यादा आणि वर्तनाच्या बाबतीत जागरूक होत आहेत.
या रिसर्चमध्ये असे आढळले की, भारतातील दहापैकी चार जणांनी कधी ना कधी आपल्या सहकर्मचाऱ्यासोबत रिलेशनशिप ठेवले आहे किंवा सध्या ते रिलेशनशिपमध्ये आहेत. मेक्सिकोमध्ये हे प्रमाण ४३ टक्के आहे, तर भारतात ४० टक्के असल्याचे दिसले. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासारख्या देशांत हे प्रमाण केवळ ३० टक्के आहे.


यामध्ये एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे पुरुषांनी महिलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात सहकर्मचाऱ्यांसोबत प्रेमसंबंध ठेवले आहेत. पुरुषांचे प्रमाण ५१ टक्के तर महिलांचे ३६ टक्के आहे. यामुळे ऑफिस रिलेशनशिपमध्ये पुरुष जास्त जोखीम घेतात असे आढळले आहे. महिलांचा एक वेगळा दृष्टिकोनही समोर आला. जवळपास २९ टक्के महिलांचे मत आहे की, करिअरवर परिणाम होऊ शकतो म्हणून त्या ऑफिस रिलेशनपासून दूर राहतात. पुरुषांमध्ये हे प्रमाण २७ टक्के आहे. उलट पुरुषांना वैयक्तिक आयुष्य बिघडण्याची अधिक भीती वाटते. त्यापैकी ३० टक्के पुरुषांनी हे कारण सांगितले, तर महिलांमध्ये हे प्रमाण २६ टक्के आहे.


या अभ्यासातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, तरुण पिढी ऑफिस रिलेशनबाबत जास्त सावध आहे. १८ ते २४ वयोगटातील ३४ टक्के तरुणांना अशा नात्यांमुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो याची अधिक चिंता वाटते. भारत ऑफिस रोमॅन्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर येण्याचे कारण म्हणजे वाढती सामाजिक मोकळीक आणि नात्यांबाबतचे बदलते दृष्टिकोन. 'ओपन रिलेशनशिप' ही संकल्पना भारतात झपाट्याने स्वीकारली जात असल्याचे दिसते.

Comments
Add Comment

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या